आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड तालुक्यातील भगवान नगर येथील गावातील अंतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी नवीन सिमेंट रस्ते तयार करावेत अशी मागणी सतीश पोकळे, संदिपान जायभाय, योगेश उगले यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
भगवान नगर मधील अंतर्गत सिमेंट रस्ते हे मागील कालावधीत ग्रामपंचायतने केलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे पूर्णपणे फुटले आहेत. सध्या पावसाळ्यात या सिमेंट रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून ग्रामस्थांना, शाळेतील मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना चालताना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्त्यात पडलेले खड्डे त्यात साचलेले पाणी याचा अंदाज न आल्याने गावातील अनेक नागरिक पाय घसरून पडले आहेत. ग्रामपंचायतने अंतर्गत रस्ते तत्काळ दुरुस्त करावेत, अन्यथा ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.