आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण मागे:युवक बेपत्ता प्रकरणाचा‎ तपास एसडीपीओंकडे‎

कळंब‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील पोफळणी येथील‎ वृषभ टेकाम या २१ वर्षीय युवकाचे १४‎ सप्टेंबरला अपहरण झाले होते. या‎ प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडून‎ करण्यासह विविध मागण्यांसाठी‎ कुटुंबीय उपोषणास बसले होते. अखेर‎ या प्रकरणाचा तपास ठाणेदाराकडून‎ काढून एसडीपीओंकडे देण्याचे‎ आश्वासन मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी‎ उपोषण मागे घेतले.‎ कुटुंबीयांनी १६ सप्टेंबरला कळंब‎ पोलिसात हरवल्याची तक्रार दिली‎ होती.

मात्र, ठाणेदार अजित राठोड‎ यांनी तपासाला गती दिली नसल्याने ३०‎ सप्टेंबरला समाज संघटनेच्यावतीने‎ तहसील कार्यालयावर मोर्चा काढला‎ होता. उपविभागीय पोलिस‎ अधिकाऱ्यांनी दोन दिवस तपासाठी द्या‎ म्हणून मोर्चेकऱ्यांना सांगितले होते.‎ परंतु दीड महिना उलटूनही गायब‎ झालेल्या ऋषभ टेकाम याचा पत्ताच‎ लागला नसल्याने दि. १ नोव्हेंबरपासून‎ तहसील कार्यालयासमोर बेपत्ता‎ युवकाची आई अंबिका टेकाम‎ यांच्यासह कुटुंबीयांनी आमरण उपोषण‎ सुरू केले होते.‎

वृषभ टेकाम याचा तपास विशेष‎ पथकाकडून करण्यात यावा, ठाणेदार‎ राठोड यांना निलंबित करण्यात यावे,‎ संशयितांना पाठीशी घालणाऱ्यांवर‎ कारवाई करण्यात यावी या‎ मागण्यांसाठी टेकाम कुटुंब उपोषणाला‎ बसले होते. गुरुवारी उपविभागीय‎ अधिकारी संपतराव भोसले यांनी भेट‎ देऊन टेकाम कुटुंबाची समजूत‎ काढली. त्यानंतर कळंब ठाणेदार‎ यांच्याकडून तपास काढून उपविभागीय‎ अधिकारी संपतराव भोसले यांनी‎ नवीन तपास पथक तयार करुन‎ त्यांच्याकडे ऋषभ याचा तपास देत‎ असल्याचे लेखी आश्वासन दिले. तर‎ ऋषभ याचे संशयित पाच मारेकऱ्यांची‎ यादी उपविभागीय पोलिस‎ अधिकाऱ्यांकडे देण्यात आली असून‎ पाचही संशयितांचा तपास करु म्हणून‎ लेखी आश्वासन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...