आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बौद्ध धम्म:अजिंठा येथील 17 व्या बौद्ध धम्म परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ पॉली अ‍ँड बुध्दिझम धम्माचल या संस्थेच्या वतीने धम्माचल अजिंठा फर्दापूर ता. सोयगाव येथे ८ नोव्हेंबर रोजी १७ वी अखिल भारतीय बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. अध्यक्षस्थानी जपान येथील भिक्खू ताईओ इनामाका हे राहणार आहेत. सकाळी १० वाजता महाराष्ट्र प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष धम्मसेवक महाथेरो यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण होईल. उद्घाटक अमेरिकेचे भिक्खू लामा रंगड्रोल, धम्माचल स्मरणीका प्रकाशन इंग्लंड येथील भदन्त चंद्रबोधी महाथेरो यांच्या हस्ते होईल.

परिषदेत भदन्त सुगतवंश महाथेरो, भदन्त शरणानंद महाथेरो, भदन्त अंगुलीमाल शाक्यपुत्र महाथेरो, भदन्त बोधिपालो महाथेरो यांच्यासह भिक्खू संघाची प्रमुख धम्मदेसना होणार आहे. प्रमुख उपस्थितीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे, इंजि. अनिलकुमार गायकवाड राहणार आहेत. या परिषदेस उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. गायकवाड, भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, उपासिका भारती हेरकर, कांताबाई रत्नपारखे, अनुराधा हेरकर, गयाबाई साळवे, प्रा. शोभा शिंदे, छाया हिवाळे, वंदना इंगळे, संजय हेरकर, भास्कर शिंदे, जी. आर. चिकटे, लक्ष्मण साबळे, प्रेमानंद मगरे, निखिल पगारे, तुकाराम सरदार, राजेश ओ. राऊत, दिलीप हिवाळे, मधूकर गायकवाड, रामेश्वर हिवाळे, प्रदिप घाटेशाही आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...