आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:ग्रामीण भागातच खऱ्या अर्थाने‎ विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते‎

बदनापूर‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातच विद्यार्थ्यांंच्या‎ व्यक्तिमवाची खऱ्या अर्थाने जडण‎ घडण होते, असे प्रतिपादन कामेडी‎ एक्सप्रेस बुलेट ट्रेन फेम योगेश‎ शिरसाठ यांनी केले.‎ बदनापूर तालुक्यातील बाजार‎ वाहेगाव येथील रायझिंग स्टार प्रा.‎ स्कुलमध्ये आयोजित सांस्कृतीक‎ बाल महोत्सवात ते बोलत होते.‎ उदघाटन देविदास कुचे यांच्या हस्ते‎ करण्यात आले. अध्यक्षस्थानी‎ संस्थेचे अध्यक्ष अॅड. प्रशांत‎ आरसूड तर प्रमुख पाहुणे म्हणून‎ पॅंथर सेनेचे संस्थापक अध्यक्ष‎ सतीश पटेकर, गजानन वाळके,‎ कैलास जारे, गणेश सुलताने, पी. यु.‎ आरसूड, राम काळे, चव्हाण,‎ ज्ञानेश्वर नाडे यांची उपस्थित होते.

‎ यावेळी विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक‎ कलाविष्कार सादर करून‎ उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.‎ पावणखिंडीतील बाजीप्रभूच्या‎ लढाईचा विद्यार्थ्यांनी केलेला‎ अभिनयास उपस्थितांनी दाद दिली.‎ मयुरी काळे हिने लावणी नृत्य सादर‎ केले. सरपंच अंकुश आरसूड,‎ उपसरपंच बाळासाहेब काळे, अरुण‎ आरसूड, शिवाजी आरसूड, सोनू‎ काळे, गोविंद काळे, शिवाजी काळे,‎ दीपक इंगळे, रेखाताई आरसूड,‎ अनिता जोरले, संध्या आरसूड,‎ कल्पना दाभाडे, दीपाली आरसूड,‎ अंजली सोनटक्के, रुपाली बोरुडे,‎ अंजली काळे आदी उपस्थित होते.‎‎

बातम्या आणखी आहेत...