आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समितीचे गठन:महिलांचे शोषण थांबवण्यासाठी समितीचे गठन अनिवार्य

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कामाच्या ठिकाणी महिलांचे होणारे लैंगिक शोषण थांबवण्यासाठी समितीचे गठन करणे अनिवार्य असून जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी तक्रार समिती स्थापना आदेशाची प्रत अध्यक्ष, सदस्यांची नावे व मोबाइल क्रमांकासह जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय) येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. एन. चिमंद्रे यांनी केले आहे.

शासकीय-निमशासकीय कार्यालये, आस्थापना, महामंडळे, संस्था, शाखा, खासगी क्षेत्र, संघटना, एन्टरप्रायजेस, अशासकीय संघटना, सोसायटी, ट्रस्ट, उत्पादक, पुरवठा वितरण, विक्री या वाणिज्य, व्यावसायिक, शैक्षणिक, करमणूक औद्योगिक, आरोग्य आदी सेवा किंवा वित्तीय कामकाज पार पाडणारे युनिट किंवा सेवा पुरवठादार रुग्णालय, शुश्रुषालये, क्रीडा संस्था, प्रेक्षागृहे क्रीडा संकुले आदी ठिकाणी अंतर्गत तक्रार समिती गठित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. समिती स्थापन नसेल तर दंडास पात्र राहील, असेही चिमंद्रे यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...