आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनुष्याला जोपर्यंत ध्येयाचे वेड लागणार नाही तोपर्यंत तो यशस्वी होणार नाही. रक्ताचा वारसा चालविण्यापेक्षा विचाराचा वारसा चालवणे सद्याच्या युगात महत्वाचे असल्याचे अशोक महाराज ईदगे यांनी सांगितले. मंठा तालुक्यातील तळणी येथे सुुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात पाचव्या दिवशीचे कीर्तनाचे पुष्पात ईदगे महाराजांनी जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या बळीवंत आम्ही समर्थाचे दास घातली या कास कळीकाळासी तेथे माणसाचा कोण आला पाड उल्लोंघनी जड गेलो आधी या अभंगावर निरूपण केले. तुकाराम महाराजांनी जगतगुरू तुकाराम महाराजांनी दास्यत्वाचा मार्ग स्वीकाराला देवाला शरण गेल्याशिवाय तो प्राप्त होत नाही. महाराजांनी पांडुरंगाच्या भक्तीत स्वत:ला वाहवून घेतले.
सर्वसामान्य भक्त सुध्दा जर देवाला जरी शरण गेले तरी त्याच्या कठीण काळात तो उभा राहतो. मनुष्याच्या जीवनात दोन दुःख आहेत एक जन्माचे आणि दुसरे मरणाचे. माता आणि संस्कार हे जवळचे नाते आहेत ते नाते पित्याच्या बाबतीत होऊ शकत नाही. कारण पित्याचे आयुष्य हे जोडाजोडीचे असते. आजकाल प्रत्येक मनुष्य हा सर्व सुखसोईयुक्त परिपक्क असला तरी मृत्युचे भय हे कायमचे आहे. ज्ञानाचा मार्ग हा कठीण मार्ग असून मनुष्याने मरणाला घाबरु नये. जीवन आनंदात जगले पाहिजे. अज्ञानी मनुष्य हा जगाला उपदेश करू शकत नाही आणि ज्ञानी मनुष्य सुध्दा जगाला उपदेश करू शकत नाही कारण त्या ज्ञानी मनुष्यासमोर जगच नसते. मनुष्य हा संसाराचा दास आहे म्हणून तो त्याच्या लौकीकाचा झेडा फडकवू शकत नाही. संसारीक माणसाने देवाचे दास्यत्व स्वीकारले पाहिजे तरच आपला उध्दार होईल. देवाची मनुष्याने संसारासाठी रडल्यापेक्षा देवासाठी रडले पाहिजे जग जिकण्यांसाठी निघालेले लोक काळाला जिंकू शकले नाही आपण तर सामान्य आहोत.
सामान्यासाठी आपल्या संतांनी दाखवलेला भक्ती मार्गच आपल्या उद्धाराचे साधन आहे. परीक्षा दिल्याशिवाय विद्यार्थी जसा पास होऊ शकत नाही तसेच भक्ती केल्याशिवाय परमार्थीक आयुष्यात मनुष्याला देव कसा प्राप्त होईल. ज्ञानाचा मार्ग हा सोपा नाही तलवारीच्या धारेसारखा तो मार्ग धारदार आहे. तो मार्ग आपल्यासाठी ज्ञानोबा तुकोबानी स्वीकारला . देवत्व प्राप्त करायचे असेल त्याला साधनेची भक्तीची जोड आवश्यक आहे.
महाराष्ट्राला वैचारिक साधनेचा पाया
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून संतांनी दिलेल्या वैचारिक साधनेचा पाया भक्कम आहे. या संत परंपरेचे पाईक आपण असल्याने तो वैचारीक वारसा आपण प्रत्येकाने जर जपला कुठली ताकत आपल्याला स्पर्श करू शकणार नाही. कारण इथे श्रध्देची व्याख्या शिकवली आहे. उत्कटपणा कृतीशील झालेली विवेक शक्ती म्हणजे श्रध्दा. ओढून ताडून बळजबरीने कुणावरही लादण्याची गरज नाही. कारण श्रध्दैचा पाया हा भक्कम असल्याने या मातीचा वारसा हा श्रध्दैचाच असून तो तुम्ही स्वीकारला तरच आपण ज्ञानोबा तुकोबाचे व संत परपंरेच खरे पाईक ठरुत असे महाराजानी शेवटी सांगीतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.