आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानुसती वृक्ष लागवड करुन भागणार नाही तर त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने दरवर्षी किमान झाड लाऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन लक्ष्मी को ऑप सोसायटीचे अध्यक्ष शंकरलाल जैस्वाल यांनी केले. सोसायटीच्यावतीने नुकतीच वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला विष्णु गोरे, रविराज जैस्वाल, लक्ष्मण लोखंडे, वसिम पठाण, प्रल्हाद लोणकर, विशाल अंभोरे, कृष्णा वाकडे, राहुल म्हस्के, फदाट, विजय गोफणे, म्हस्के, राजू मेठी यांची उपस्थिती होती. जैस्वाल म्हणाले, भविष्यात कुणीच वृक्ष तोड करणार नाही यासाठी आम्ही सर्वांनी जागृत राहुन होत असलेली वृक्ष तोड थांबवली पाहीजे. या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. विष्णु गोरे यांनी सांगितले, वृक्ष लागवडीमुळे वातावरणाचा होत असलेला ऱ्हास थांबतो. कोरोना काळात ऑक्सीजनचा तुटवडा जाणवला. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. नागरीकांनी नगरपंचायत तथा आपआपल्या ग्रामपंचायत, विविध नर्सरीमध्ये उपलब्ध असलेली रोपटे घेऊन लागवड करावी. असे आवाहन केले. यावेळी शहरातील विविध भागात २०१ झाडे लावण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.