आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखाची प्राप्ती:पुण्यवाणी असेल तर जिनवाणी मिळणं अवघड नाही : डॉ. गौतममुनीजी म.सा.

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृहस्थाश्रमात मनुष्याला सुखाची प्राप्ती नाही. केवळ ज्ञान हे सम्यक दर्शन असल्याशिवाय जसं मिळत नाही तसच आत्मज्ञान मिळवण्यासाठीही उत्तम कर्म करावे लागते. पुण्यवाणी असेल तर जिनवाणी मिळणे अवघड नाही, असे डॉ. गौतममुनीजी म.सा. यांनी सांगितले.गुरुगणेशनगरमधील तपोधाममध्ये चातुर्मासानिमित्त आयोजित प्रवचनात ते बोलत होते. गृहस्थाश्रमात दु:ख भरले आहे. तरीही मनुष्याला गृहस्थाश्रमातच राहावेसे वाटते. प्रत्येकानेच गृहस्थाश्रम सोडून द्यावा आणि दीक्षा घ्यावी, असे आम्ही मुळीच म्हणणार नाही. मात्र ज्यात सुखाची प्राप्ती नाही, तो आश्रम काय कामाचा! जिथे पुण्यवाणी असेल, पुण्यकर्म होत असेल तिथे जिनवाणी मिळणे अवघड नाही, सत्य झुगारून चालत नाही. परंतु असत्याला काय म्हणून जवळ करायचं? नवीन लग्न झालेल्याची पत्नी सकाळी लवकर उठून कामाला लागू लागते.

परंतु ते महाशय तर सूर्यदर्शन झाल्यानंतरही उठतीलच असे नाही. म्हणजेच याला सुख म्हणणार का? मनुष्य स्वभाव कसा सरळ असला पाहिजे. सरळ स्वभावाची माणसंचं काही तरी करू शकतात. ज्यांच्या स्वभावात सरळता नाही, ते बिचारे काय करणार ! केवळ ज्ञान मिळवून फायदा नाही तर सम्यक दर्शन जीवनात घडले पाहिजे. सत्य कधीही झुकत नाही आणि असत्याला जिनवाणीत थारा नाही. संयमी जीवन जगा, आत्मा शुद्ध होईल असे कृत्य करा, असा उपदेश डॉ. गौतममुनीजी यांनी केला. वैभवमुनीजी म्हणाले, नियम सोडून काहीही करता येत नाही. जे नियमाच्या बाहेर जातात, नियमाचे पालन करत नाहीत, त्यांना भगवंत प्रसन्न कसा होईल? आत्म्याला मालामाल करायचे असेल तर निर्दोष जीवात्म्याचा छळ का करता? विनाकारण आणि जाणीवपूर्वक कुणाचाही छळ करू नका.

सामायिकचे पचखान घेतले तर त्याचीच अलोचना करावी का, मारपीट तरी का करावी, दमदाटी केल्याने आपण फार काही मोठे झालो, हा समज काढून टाका. आहार कसा असावा, खोटं कधीही बोलू नये, पशुपक्ष्यांवर दया करावी, खोटी साक्ष देऊ नये आणि आपल्या जवळचे किंवा इतरांचे काहीही गहाण ठेवू नये, आहार हा नेहमीच चांगला घेतला पाहिजे. उत्तम आहार हा नेहमीच चांगला असतो. म्हणूनच त्याचा पुरस्कार केला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...