आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरूपण:मुलांसाठी संपत्ती नाही कमवून ठेवली तरी चालेल, मात्र संस्कार नक्की द्यावेत; कीर्तनमालेत विष्णू महाराज सास्ते यांचे निरूपण

पिंपळगाव रेणुकाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज समाजात विदारक चित्र पहायला मिळत आहे. योग्य संस्काराअभावी तरुण पिढीचे पाऊल चुकीच्या दिशेने पडून त्यांची भावी आयुष्यातील गणिताची घडी विस्कटत चालली आहेे. हे परिणाम लक्षात घेता प्रत्येक आई वडीलाने आयुष्यात संपत्ती नाही कमवून ठेवली तरी चालेल मात्र आपल्या मुलांना योग्य वेळी योग्य संस्कारात वाढी लावणे ही काळाची गरज असल्याचे निरुपण ह.भ.प.विष्णू महाराज यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले.

भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे आयोजित किर्तन मालेत ते शनिवारी रात्री बोलत होते. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना महाराज म्हणाले की पती-पत्नी ही संसाराची दोन महत्त्वाची चाके आहे. यातील महत्त्वाचे चाक म्हणजे पत्नी आहे. कारण घरातील प्रत्येक पूरुषाच्या यशामागे पत्नीचा हात असतो. शिवाय तुकाराम महाराजांनी देखील आईचे दुसरे रुप म्हणून पत्नीला संबोधले आहे. कारण आई नंतर पत्नीच ही घरातील संपूर्ण जबाबदारी पार पाडत असल्याचे विष्णू महाराजांनी सांगितले.आपल्या समाजाबाबत एक खंत व्यक्त करताना त्यांनी सांगितले की समाजात खेकडा वृत्ती वाढत चालली आहे.जो-तो एकमेकाचा सुख व आनंद पाहुन जळू लागला आहे.

एकमेकाला खाली ओढण्यात आणि नावे ठेवण्यातच समाजातील आपली लोक धन्यता मानत आहे. पंरतु असे लोक जिवनात शेवटच्या श्वासापर्यंत सुखी राहु शकत नाही.कारण जिथे चांगले आहे. तिथे भगवंत आहे. आणि चांगल्याचे भगवंत कधीच वाईट होऊ देऊ शकत नाही.

यासाठी माणसाने जळपट वृत्ती सोडून आपली प्रगती कशी साधता येईल याचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. शिवाय तरुणांना मार्गदर्शन करताना महाराजांनी सांगितले की आज प्रत्येक तरुणाने आपल्या आई-वडीलांच्या कष्टाचे चिज केले पाहीजे. आई-वडील मुला-मुलींना रक्तांच पाणी आणि हाडांच माड करुन अफाट कष्ट करुन शिकवतात मात्र आजच्या तरुणाईला त्यांच्या कष्टाचे काहीही एक वाटत नाही. ही खुप मोठी शोकांतीका आहे.

तारुण्यात तुम्ही जर कठीण परिश्रम घेऊन यश मिळवीले नाही तर पुढचा काळ हा तुमच्यासाठी अतिशय वाईट आणि वेदनादायक असल्याचे महाराजांनी सांगितले.यासाठी प्रत्येक तरुणाने जिवनातील ध्येय साध्य करण्यासाठी राञीचा दिवस करणे गरजेचे आहे.तुम्ही मेहनत करुन मिळवलेल्या यशाचा आई वडीलांना झालेला आनंद हा न मोजता येणारा राहील असा सल्ला देखील विष्णू महाराज यांनी या वेळी दिला. दरम्यान, जी बाब आपल्या घरात घडते त्यावरच घराती पाल्यांचे संस्कार अवलंबुन असतात. यामुळे पालकांनीही या बाबीचे मुल्यमापण करायला हवे.

माणसाने प्रामाणिकपणा पशूंकडून शिकावा
आज समाजात थोडास्या स्वार्थापायी रक्तातील नाते दुरावत आहे. भावाला भाऊ म्हणण्यास कुणी तयार नाही. प्रत्येकजण स्वार्थ आणि मोहासाठी संबंध ठेवतो आहे. मात्र या स्वार्थी दुनीयेत आज माणसापेक्षा गोठ्यातील जनावरं बरे असल्याचे दिसत आहे. त्याला थोडा जरी जिव लावला तर तो आपल्या मालकाशी ईमान राखतो. समाजातील काही लोकांना कितीही जिव लावा, प्रेम करा तरीही ते वेळ आल्यावर त्यांची पत दाखवतीलच असा टोला देखील कीर्तनाच्या समारोप प्रसंगी सास्ते महाराजांनी आपल्या किर्तनात दिला.

बातम्या आणखी आहेत...