आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआजच्या धकाधकी आणि धावपळीच्या युगात माणूस माणुसकी विसरत चालला आहे. यामुळे प्रत्येकाने आपल्या मुलाला मोठा साहेब बनवता आला नाही तरी चालेल परंतु त्याला समाजाच्या लायक असणारा माणूस नक्की बनवा, असा सल्ला शिवराज महाराज पवार यांनी कीर्तनातून दिला.
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथे अखंड हरिनाम सप्ताहात काल्याच्या किर्तनात ते बोलत होते. आज या विश्वात संपत्तीच्या मोहापायी माणुस हा माणुसकीचे विसर्जन करु लागला आहे. दुसऱ्याचे सुख पाहुन माणस दुःखी होतांना आपण पाहत आहोत. सत्ता आणि पैशाचा गवगवा करणाऱ्यांनी एक गोष्ट माञ नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की वेळ आणि काळ हा कोणासाठीही थांबत नसुन प्रत्येकाचे दिवस बदलत असतात. यासाठी कुणीही आपल्या जवळ असलेल्या संपत्तीचा व सत्तेचा गर्व न करता गोरगरीबांना मदत करुन धार्मिक व सामाजिक कार्यात देखील हातभार लावुन आपल्यातील माणुसकी जिवंत ठेवली पाहीजे.
दरम्यान आजच्या कलयुगातील चिञ बदलत चालले आहे. योग्य संस्काराअभावी भावी पिढीची घडी कुठेतरी विस्कटत चालली आहे. त्यामुळे समाजात व्यसनाधिनतेचे प्रमाण देखील वाढले आहे. व्यसनामुळे अनेक सुखी संसार उद्धवस्त होत आहे. यासाठी आई- वडिलांनी देखील आपल्या मुलांना लहान वयातच योग्य संस्कारात घडविणे गरजेचे आहे. जो चांगले काम करतो त्यांच्यासोबत कधीही परमेश्वर सहवास करीत असतो.व जो वाईट काम करतो त्याची जागा त्याला परमेश्वर दाखवतच असतो. यासाठी परमेश्वराचे प्रेम व आशिर्वाद हवे असेल चांगले कामे करा. इतरांना अडचणीच्या काळात मदत करा, असे आवाहन शिवराज महाराजांनी केले. घराला वारस म्हणुन पाहिल्या जाणाऱ्या व्यक्तीला योग्य वयात योग्य संस्कार करता आले नाही तर संपूर्ण घराची आणि परिवाराची घडी विस्कटते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.