आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी हवालदिल:एकर शेती भिजवण्यास शेतकऱ्यांना लागतो तीन दिवसांचा कालावधी

पिंपळगाव रेणुकाई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यात यावर्षी मोसमी पावसासह परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे सर्वत्र पाणी डबडब करू लागले आहे. एकीकडे खरीपात नुकसान झाले असले तरी झालेले नुकसान रब्बीत भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीवर जोर दिला आहे. सध्या रब्बी पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली असताना महावितरणकडून माञ सतत विज पुरवठा खंडीत केला जात असल्याने एक एकर शेती भिजविण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल तीन दिवस लागत असल्याचे वास्तव शेतकऱ्यांनी दिव्य मराठीकडे मांडले आहे. खरिपाप्रमाणे रब्बी देखील पाण्याआभावी हातातुन जाण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी खरीपात पिके डोलदार जमली होती. अपेक्षित उत्पादन हाती लागेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. तशी मेहनत देखील शेतकऱ्यांनी खरिपात घेतलेली होती. परंतु निसर्गाच्या मनात काही औरच असल्याने ऐन हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.प्रशासनाकडून केवळ पंचनामे करण्यात आले. माञ नुकसान मदत अद्याप शेतकऱ्यांच्या पदरात पडली नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी स्वतःला सावरत उपलब्ध पाण्याचे नियोजन करीत रब्बीत गहु, हरभरा, मका, ज्वारी आदी पिकाची पेरणी केली आहे.

तर काही शेतकरी पेरणी करु लागले आहेत. रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या सगळीकडे पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत आहे. माञ शेतकऱ्यांच्या रब्बीत देखील महावितरण खोडा घालत असल्याने शेतकरी परेशान झाले आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या अडचणी येत आहेत.

एक एकर शेती भिजविण्यासाठी तब्बल तीन दिवस लागत असल्याचे शेतकरी सांगत आहे. पेरणी केलेली पिके नुकतीच जमिनीतुन उगवून वर येऊ लागली आहेत. त्यामुळे या पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना सुरळीत विज पुरवठा देणे गरजेचे आहे. माञ तसे होत नसल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तालुक्यात आतापर्यंत जवळजवळ चाळीस ते पन्नास हजार हेक्टरवर रब्बीची पेर पूर्ण झाली असल्याचा अंदाज आहे. यात आणखी पंधरा हजार हेक्टरची भर होण्याची शक्यता आहे.

रब्बी पिकाना फटका
आधीच खरीपात नुकसान झाल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. त्यात पुन्हा मोठी तजवीज करुन शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी पूर्ण केली असताना महावितरणकडून नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांना छळणे सुरू आहे. पेरणी केलेल्या गहु, हरभरा, मका पिकाला पाण्याची निंतात आवश्यकता आहे. यातच सतत विज पुरवठा खंडीत होत असल्याने कोवळी पिके पाण्याअभावी सुकु लागली आहेत. त्यामुळे सुरळीत वीज पुरवठा मिळणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...