आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तालुका प्रथम:युडायस शैक्षणिक प्रणालीत जाफराबाद तालुका प्रथम

जाफराबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युडायस शैक्षणिक प्रणालीत उत्कृष्ट काम केल्याबद्दल जाफराबाद तालुका प्रथम आला आहे. याबद्दल गटशिक्षणाधिकारी डॉ. वानखेडे यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.

शासनाच्या सर्व योजना या युडायस शिक्षण प्रणालीवर आधारीत असतात. त्यात वर्गखोल्या, स्वच्छता गृह, किचनशेड पिण्याचे पाणी, विद्यार्थी संख्या त्यांना मिळणाऱ्या इतर सोयीसुविधा जसे की खेळ साहित्य, संगणक, दिव्यांग विद्यार्थी, आवश्यक व उपलब्ध शिक्षक संख्या इत्यादी माहिती शासन स्तरावर तत्काळ उपलब्ध होऊन विविध योजनांची अंमलबजावणी यशस्वीरित्या होण्यासाठी मदत मिळते.

या प्रणातील गटशिक्षणाधिकारी डा.भरत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती, मुख्याध्यापक यांनी उत्कृष्ट कार्य केले. याबद्दल विभागीय उपसंचालक साबळे, सहाय्यक उपसंचालक काळूसे, शिक्षण उपनिरीक्षक डॉ. सतिष सातव, शिक्षणाधिकारी कैलास दातखीळ, मंगल धूपे यांनी ी डॉ. भरत वानखेडे, जिनेंद्र काळे, शिवाजी फोलाने, राम खराडे, गट समन्वयक वसंता शेवाळे, भानुसे, वाघ, सोनुने, नवले, चिंधोटे, खरात, मांटे, नागरे, सोळंके, चिंधोटे, नारायण पिंपळे आदींचे अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...