आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ५५ ग्राम पंचायतींचा निकालात कुठे प्रस्थापितांना धक्का तर इतर कहीं खुशी कहीं गम अशी परिस्थिती पाहावयास मिळाली. तालुक्यातील चार पैकी तीन माजी सभापतींचा पराभवावे तोंड पहावे लागले. मात्र नाना भागिलेंनी एकमेव गड राखला.
५५ पैकी ३८भाजपचे ११ राष्ट्रवादी काँग्रेस, सांजोळ,आढा, आरदखेडा सवासणी या ४ जागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा विजय, काँग्रेस व स्वाभिमानीने प्रत्येकी १ जागेवर ताबा मिळवला आहे. विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला. सकाळी दहा वाजेनंतर जसजसा निकाल जाहीर होऊ लागला तस तसा अनेकांना धक्कादायक ठरला. अनेक प्रस्थापित आपले गडही राखु शकले नाहीत. मतमोजणी परिसरात पोलिसांनी मोठया प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. दरम्यान, ४५१ सदस्यापैकी ४१३ सदस्य भाजपचेच निवडून आल्याचा दावा आमदार संतोष दानवे यांचे स्वीय सहायक उध्दव दुनगहु यांनी केला आहे.
विजयी उमेदवारांत चापनेर दैवशाला काळे, बेलोरा लक्ष्मीबाई शेळके, हिवरा बळी राजेंद्र लोखंडे, जानेफळ पं-अनिता पंडीत, चिंचखेडा सविता सरोदे, गोंधनखेडा-विठ्ठल गोरे, येवता -शिला चौथमोल, कोल्हापुर भोरखेडा नंदाबाई जाधव, आसई विजय इंगळे, घानखेडा दिपिका भाले, माहोरा गजानन लहाने, पिंपळगाव कड अनिल मलाटे, वरुड खुर्द केसरबाई गाढे, म्हसरुळ शारदा लहाने, आरदखेडा/गोकुळवाडी शिवानी भिसे, विरखेडा भा/रेपाळा-गणेश शेळके, वरखेडा विरो-देविदास उबाळे, पासोडी-चंदन ताटु, आडा-बेबीनंदा वायघळ, भारज खुर्द-लिलाबाई गव्हाणे, वानखेडा द्वारकाबाई साळवे, शिंदी-केसराबाई जंजाळ, सवासनी सतिश गाडेकर, खापरखेडा-शोभा निकाळजे, सोनगिरी-कासाबाई शेळके, कोळेगाव मंदाबाई भागिले, सांजोळ दिलिप गायकवाड, कोनड बु अशोक पवार, खासगाव रोहिणी लोखंडे, मेरखेडा-सुखदेव जाधव, देऊळगांव उगले-रघुनाथ पंडीत, कुंभारी सिमा मोरे आदी उमेदवार सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.