आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिन साजरा:जय बजरंग तालीम संघ; जिल्हा मल्लखांब असोसिएशनतर्फे जागतिक मल्लखांब दिन साजरा

जालना13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जय बजरंग तालीम संघ, जालना जिल्हा मल्लखांब असोसिएशनच्या वतीने जागतिक मल्लखांब दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी व्यास यांच्या हस्ते बाळभट्ट दादा देवधर यांच्या वस्ताद रावसाहेब पहेलवान सुपारकर यांच्या प्रतिमेचे आणि मल्लखांब पुजन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष गणेश सुपारकर, सुभाष देठे, खरात, महेंद्र सोरटी, जवाहर तुल्ले, सचिव पाटेकर, बोराडे, सुरेश सुपारकर, रमेश सुपारकर, राहुल सुपारकर, अंबरिश सुपारकर, उद्धव गोगडे, विजय तौर, रविराज सुपारकर, कृष्णा राहुल गोगडे उपस्थित होते. यावेळी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. रावसाहेब पहेलवान सुपारकर यांनी ४० वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या जय बजरंग तालीम मंडळाच्या माध्यमातून गणेश सुपारकर यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लखांब हा घराघरात पोहोचावा हा उद्देश असून लाठी फिरवणे, लेझीम पथक, टिपऱ्या, करेले फिरवणे याचे खेळाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...