आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा योजना:भोकरदन शहरातील जलकुंभाचे काम रखडले ; जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष

भोकरदन11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासाठी खडकपूर्णा योजनेतून बांधण्यात येणाऱ्या जलकुंभाचे बांधकाम दोन वर्षांपासून रखडलेले आहे. हे बांधकाम कधी पूर्ण होऊन याद्वारे भोकरदन शहराला सुरळीत पाणीपुरवठा केव्हा सुरू होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कामाकडे संबंधित जीवन प्राधिकरण विभागाचे दुर्लक्ष दिसत आहे.

भोकरदन - सिल्लोड शहराचा कायमचा पाणी समस्येचा प्रश्न मिटण्यासाठी सिल्लोड भोकरदन साथी खडकपूर्णा धरणावरून संयुक्त पाणीपुरवठा योजना २००४ मध्ये मंजूर झाली. या योजनेअंतर्गत भोकरदन येथील पेशवेनगरमध्ये नगर परिषदेचा जुना जलकुंभ पाडून त्याच जागेवर जास्त साठवणूक क्षमतेची असल्याचे जलकुंभाचे काम सुरू करण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या जलकुंभाचे काम रखडले असून सहा महिन्यांपासून हे बांधकाम अर्धवट स्थितीत पडून आहे. बांधकाम पूर्ण केव्हा होईल याद्वारे भोकरदन शहरातील पाणीपुरवठा केव्हा सुरळीत सुरू होईल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शहराला नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...