आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्य विभागाचे निरीक्षण:खासगी रुग्णालयात लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करून परस्पर घरी पाठवल्याने कोरोनाचे निदान होईना

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना थांबवून त्यांची अँटिजन टेस्ट केली. - Divya Marathi
पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना थांबवून त्यांची अँटिजन टेस्ट केली.
  • संशयितांचे नमुने तपासणी केंद्रावर न पाठवल्यास डीएचओंचा कारवाईचा इशारा
  • कोरोनाचा विळखा होतोय घट्ट, मृतांची संख्या 673, तर बाधितांचा आकडा पोहोचला 41 हजार 10 वर

सर्व खासगी रुग्णालयात विविध उपचारांसाठी संशयित SARI,ILI रुग्ण सर्दी, तापसदृश व तीव्र श्वसनदाहचे रुग्ण येतात. यात कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचार करुन परस्पर घरी पाठविण्यात येते. यामुळे रुग्ण कोविडबाधित आहे किंवा कसे याचे निदान होत नाही. निदान न झाल्यामुळे सदरील रुग्ण गंभीर होऊन रुग्णालयात दाखल होतात. तसेच यातून रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते, तर रुग्ण घरी असताना निरोगी लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे संबंधित खासगी रुग्णालयाने लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यापूर्वी त्यांना स्वॅब तपासणी केंद्रावर पाठवावे, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा डीएचओ डॉ. विवेक खतगावकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून दिवसेंदिवस बाधितांसह व मृतांची संख्या वाढत आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सक्त सूचना देण्यात आल्या. कोरोना तपासणी अहवाल व प्राप्त मार्गदर्शक सूचनानुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना सक्त लेखी स्वरूपात नोटीसही देण्यात आली आहे. दरम्यान, जे खासगी वैद्यकीय व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतील अशा हॉस्पिटल, रुग्णालयाचे महाराष्ट्र बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार कलम ५ अन्वये नोंदणी रद्द करण्यात येईल. साथरोग आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ कलमान्वये कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे १६ बाधितांचा बळी; नव्या ८०९ रुग्णांची भर, ९०० जणांना मिळाला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूचे तांडव घातले असून शुक्रवारी उपचारादरम्यान १६ बाधितांचा मृत्यू झाला. तर ८०९ रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या ६७३ तर बाधितांचा आकडा ४१ हजार १० वर जाऊन पोहोचला असून संसर्ग रोखण्याचे आव्हान जालनेकरांसमोर उभे राहिले आहे. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात ९०० तर आतापर्यंत एकूण ३३ हजार ७५३ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून दिलासादायक बाब आहे.

संस्थात्मक अलगीकरणात ८४६ रुग्ण
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शुक्रवारी दिवसभरात ८४६ जणांना संस्थात्मक अलगीकरणात पाठवण्यात आले आहे. यात राज्य राखीव पोलिस बल क्वाॅर्टर ए ब्लॉक -७०, बी ब्लॉक - ६८, सी ब्लॉक - ७०, डी ब्लॉक- ३९, ई ब्लॉक - २८, एफ ब्लॉक - ५०, के.जी.बी.व्ही परतूर -३५, के.जी.बी.व्ही मंठा - १७, शासकीय तंत्रनिकेतन अंबड - २३९, शासकीय मुलांचे वसतिगृह बदनापूर - १९, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह घनसावंगी - ५९,अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह घनसावंगी -६८, के.जी.बी.व्ही. घनसावंगी – ४५, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह इमारत क्र. २ भोकरदन – ३३, आयटीआय कॉलेज जाफराबाद – ६ असे हे रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...