आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वरनिनाद:विश्वात जालन्याचा स्वरनिनाद व्हावा : शोमा बॅनर्जी

जालना11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टी आणि जालना जिल्ह्यातील गायक, संगीतकार, कलावंत यांच्यात शैलेंद्र टिकारिया यांनी समन्वय सेतू निर्माण केला असून जालन्यातील कलावंतांचा स्वरनिनाद विश्वात गुंजायला हवा अशा सदिच्छा बॉलीवूड मधील पार्श्वगायिका शोमा बॅनर्जी यांनी व्यक्त केल्या.

सांस्कृतिक मंच आयोजित “व्हाईस ऑफ जालना” स्पर्धेची उपांत्य आणि महाअंतिम फेरी सोमवारी सायंकाळी दानकुँवर शाळेच्या प्रांगणात संपन्न झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत डॉ. प्रीती काटोळे ह्यांनी प्रथम क्रमांक पटकावत “ व्हाईस ऑफ जालना “ च्या त्या मानकरी ठरल्या. पारितोषिक वितरण प्रसंगी बॉलीवूडचे पार्श्वगायक विपिन सचदेवा,बी.एस. टिकारिया, उद्योजक कमलबाबू झुनझुनवाला, सुनील भाई रायठठ्ठा, गौतमसिंह मुनोत, डॉ. जवाहर काबरा, संगीतकार शैलेंद्र टिकारिया,परिक्षक राजेश जैस्वाल, मृणाली वाहने, शीला रायठठ्ठा,डॉ. सोनाली मुनोत, रेखा अग्रवाल, सरला अग्रवाल, शुभांगी देशपांडे,मनोज टिकारिया, मिलिंद दुसे,प्रकाश कुंडलकर, सिद्धांत टिकारियायांची प्रमुख उपस्थिती होती. शोमा बॅनर्जी यांनी “गाणे गळ्यात बसलेले असावे, गीताचे बोल, व्याकरण लक्षात घेऊनच स्पर्धेत गाणे निवडावे”, असे नमूद करत इतकी वर्षे संगीत प्रवासानंतरही आम्हाला संगीतकार बारकावे सांगतात असे स्पष्ट केले.

सूत्रसंचालन भावना सारडा यांनी तर मिलींद दुसे यांनी आभार मानले. उपांत्य फेरीतील २१ स्पर्धकांमधून सर्वोत्कृष्ट अकरा स्पर्धकांत झालेल्या महाअंतिम फेरीत प्रथम डॉ. प्रिती काटोळे, द्वितीय शब्बीर बेग, तृतीय विद्या म्हस्के विजेते ठरले. त्यांना रोख रक्कम, स्मृती चिन्ह देण्यात आले. तर निधी अग्रवाल, गणेश शर्मा, प्रिती सोनवणे, मयुरी पिंपळे, विराम आव्हाड, पुजा वेताळ, वैभवी झाडोकार, रोशनी पारवे, यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सीमा नानावटी, दिव्या शाह, स्वरूपा पिपाडा आदींनी परिश्रम घेतले. या वेळी स्पर्धक, पालक, रसिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...