आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:नाशिक राज्य तायक्वांदोसाठी जालन्याचा संघ झाला रवाना ; स्पर्धेत होणार सहभागी

भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक येथे २८ ते ३० ऑगस्टदरम्यान आयोजित होत असलेल्या इंडिया तायक्वांदोच्या देखरेखीमध्ये व तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या आयोजन मध्ये राज्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेकरिता जालना जिल्हा संघ हा नाशिक येथे रवाना झाला आहे.

हा संघ जालना जिल्हा च अधिकृत संघ असून या संघात सर्व खेळाडू सहभागी होणार आहे. यामध्ये ओम जोशी, यश महाजन, राखी कासदेकर, आर्या तुपकर, अवनी घोडके, पंकज ढाकणे, जागृती वाघमारे, ओवी मांगडे, शुभ्रा गरदास, आर्यन देशमुख, चैतन्य वाघमारेया सर्व खेळाडू ना तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हाचे अध्यक्ष अरविंद देशमुख स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. या संघा सोबत प्रशिक्षक मयूर पिवळ, प्रतीक ढाकने, ज्ञानेश्वर मोरे यांच्या देखरेखमध्ये हा संघ नाशिक येथे पदकसाठी प्रयत्न करणार आहे. या वेळी तायक्वांदो असोसिएशन जालना जिल्हाचे सचिव सचिन आर्य, विजय कमळेे पाटील, धनसिंह सूर्यवंशी, अशोक पडूळ, संतोष कराळे, रमेशअण्णा जाधव यांची यांची यावेळी उपस्थिती होती. या वेळी खेळाडूंना सुभेच्छा देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...