आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगाव सपकाळला समता सैनिक दल प्रशिक्षण

जळगाव सपकाळ‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोकरदन तालुक्यातील जळगाव‎ सपकाळ येथे श्रीमती गंगुबाई‎ राघोजी साळवे चॅरिटेबल ट्रस्ट व‎ भारतीय बौद्ध महासभा यांच्या‎ संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर यांनी स्थापित केलेल्या‎ समता सैनिक दलाच्या ९६ व्या‎ वर्धापन दिनानिमित्त धम्म गंगा बुद्ध‎ विहारात बाल, नवयुवक आणि‎ महिलांसाठी एक दिवसाचे समता‎ सैनिक दल प्रशिक्षण व मार्गदर्शन‎ शिबिराचे आयोजन करण्यात आले‎ होते.‎ यावेळी समता सैनिक दलाचे‎ औरंगाबाद जिल्हाध्यक्ष किशोर‎ जोहरे, मेजर अनिल राऊत, मेजर‎ गायकवाड, डि. ओ. दांडगे, कमांडर‎ ऑफिसर भिसे यांची उपस्थिती‎ होती. यावेळी ध्वजारोहण, दहा‎ मिनिटाचे आनापान सत्र, सामूहिक‎ त्रिशरण पंचशील आणि वंदना‎ घेऊन प्रशिक्षणास सुरुवात करण्यात‎ आली.

कवायत, संचालन,‎ लाठीकाठी व स्वरक्षणाचे विविध‎ पैलू शिकविण्यात येऊन त्याचे‎ प्रात्यक्षीक करून घेतले. आयोजक‎ कृष्णा साळवे यांनी धम्म गंगा बुद्ध‎ विहाराची वाटचाल व उद्दिष्टे सांगून‎ समता सैनिक दलाची स्थापना डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांनी २४‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सप्टेंबर १९२४ रोजी महाड येथे केली‎ होती. शेकडो वर्षे मान खाली घालून‎ चालणारे लोक आता मान वर करू‎ लागले होते.

माणसे मुक्तीच्या वाटा‎ चालू लागली होते. अशावेळी‎ गावागावातील लोकांच्या‎ रक्षणासाठी संत सैनिक चळवळीची‎ ताकद कामी आली व आजही ही‎ टिकून आहे असे सांगितले. यावेळी‎ शाहिर रामराव खरात, नंदा साळवे‎ यांच्या भीम, बुद्ध गीतांचा कार्यक्रम‎ झाला. लक्ष्मीबाई साळवे यांनी‎ आभार मानले. प्रशिक्षणासाठी‎ साहेबराव साळवे, राजेंद्र साळवे,‎ दादाराव साळवे, विजय साळवे,‎ दिलीप साळवे परिश्रम घेतले‎.

बातम्या आणखी आहेत...