आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशय:‘अहो बाबा, थांबा, तसं करू नका,’ असं मुलगा म्हणत असतानाच पत्नीला टाकले विहिरीत, पळून जात असताना आरोपी जेरबंद

टेंभुर्णीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आरोपी संताेष मनाेहरचा तीन दिवसांचा पीसीआर

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तीक्ष्ण हत्याराने पोटावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील हनुमंतखेडा येथे रविवारी घडली. अनिता मनोहर भोपळे (३६) असे मृत विवाहितेचे नाव आहे. मनोहर पाटीलबा भोपळे असे आरोपीचे नाव आहे. वडिलांकडून आईला मारहाण झाल्याची माहिती मिळताच मुलगा धावत शेताकडे येत होता. त्याच वेळी वडील आईला उचलून विहिरीत टाकण्यासाठी नेत होते. या वेळी सतीश भोपळे या त्यांच्या मुलाने ‘अहो बाबा, थांबा, तसं करू नका,’ असं म्हणत असतानाच वडिलाने आईला विहिरीत टाकले.

हनुमंतखेडा येथील मनोहर भोपळे यांनी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास हनुमंतखेडा शिवारातील पांढरी नावाच्या शेतातील गोठ्याजवळ पत्नी अनिता मनोहर भोपळे हिच्या पोटावर तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेतच पत्नीला उचलून विहिरीत फेकून दिले. याप्रकरणी आरोपी मनोहर भोपळे यांचा मुलगा सतीश भोपळे यांच्या फिर्यादीवरून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेची माहिती पोलिसांना मिळताच चार तासांच्या आत आरोपीला जाफराबाद बस स्थानकावरून पळून जात असताना पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले . सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर पायघन, ज्ञानेश्वर साखळे, पंडित गवळी, गजानन काकड, गजेंद्र भुतेकर, धनंजय जगदाळे, प्रदीप धोंडगे, हरी क्षीरसागर यांनी आरोपीचा शोध घेत रात्री साडेअकरा वाजता जाफराबाद बसस्थानकातून ताब्यात घेतले. मुलाच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीस तीन दिवसांचा पीसीआर
आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्यास तीन दिवसांचा पीसीआर मंजूर करण्यात आला आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून केल्याची कबुलीही आरोपीने दिली आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी अनेक पुरावे गोळा करून ते संकलित केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...