आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Jalna
  • Jalna Bokardan Murder News | Crime | Friends Murder Of A Friends In Bhokardan | Marathi News| The Murder Of A Friend By A Friend In A Minor Dispute; Brutal Murder By Throwing Stones At The Head

धक्कादायक!:किरकोळ वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या; डोक्यात दगड घालुन निर्घृण खून

महेश देशपांडे | भोकरदन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भगवान राजू तळेकर याचा त्याचाच मित्र मंगेश दळवी याने, किरकोळ वादातून दि. 17 रोजी रात्री सोयगाव फाट्यावर, रागाच्या भरात डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली पोलिस तपासात दिली आहे. भगवान तळेकर या 22 वर्षाच्या तरुणाचा खून झाल्याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवून 2 तासाच्या आत खून करणाऱ्या त्याच्या मित्राला अटक केले त्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरनी भोकरदन पोलिस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवान राजु तळेकर (वय 22 ) तरुण एका ट्रान्सपोर्ट मध्ये चालकाचे काम करीत होता तेथेच त्याचा मित्र मंगेश कैलास दळवी ही त्याच्या सोबत काम करीत होता दरम्यान दोन दिवसापूर्वी भगवान तळेकर हा घरून निघून गेला होता त्याचा मृतदेह दि. 19 रोजी भोकरदन जालना रोडवर सोयगाव फाट्याजवळ एका शेतात मिळाला भोकरदन पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळ पंचनामा केला घटनेची सखोल चौकशी करून तपास चक्रे गतीने फिरविली घटनास्थळावर मिळालेले पुरावे व मृत व्यक्तीच्या मोबाईल मधील मिळालेली माहिती व त्याच्या संपर्कात असलेल्या मित्राचा त्यांनी तात्काळ शोध घेतला इंगळेवाडी येथे राहणारा मंगेश कैलास दळवी यास दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मंगेश दळवी याने, सांगितले की दि. 17 रोजी संध्याकाळी मंगेश दळवी व मृत भगवान तळेकर हे दोघे मित्र भोकरदन वरुन जाण्याकडे जाण्यासाठी निघाले जालन्याला जाण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये वाद विवाद झाले दरम्यान भोकरदन जालना रोडवर सोयगाव फाट्यावर ते थांबल्यावर ते दोघांमध्ये वाद-विवाद झाली रागाच्या भरात मंगेश दळवी याने त्याचा मित्र भगवान तळेकर याच डोक्यात दगड मारला त्यातच त्याचा मृत्यू झाला ती अशी कबुली पोलिस तपासात यांनी दिली आहे.

दरम्यान हे दोघेही मद्यार्काचे अमलातही होते अशी माहिती पोलिसांनी दिली सदर प्रकरणात मृत व्यक्तीच्या आईच्या तक्रारीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सपोनि रत्नदीप जोगदंड हे करीत आहे गतीने तपास चक्रे फिरवून गुन्ह्याची तात्काळ दोन तासात उकल भोकरदन पोलीस ठाण्याचे सपोनि रत्नदीप जोगदंड सपोनि राजाराम दळवी सचिन कापुरे दादाराव बोर्डे अभिजित वायकोस गणेश पायघन विकास जाधव दीपक इंगळे गणेश निकम समाधान जाधव आसिफ शेख रामेश्वर सिनकर या पोलिसांनी तपासात महत्त्वाचे कार्य केले व तात्काळ गुन्ह्याची उकल केली.

बातम्या आणखी आहेत...