आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाच प्रकरण:पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई, तिघांना जामीन

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खिरडकर यांना हेअरिंगसाठी न्यायालयात आणण्यात आणणार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी झाली होती.

अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी २ लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी उपविभागीय अधिकाऱ्यासह दोन पोलिस कर्मचारी लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. दरम्यान, डीवायएसपी सुधीर खिरडकर व पोलिस नाईक संतोष अंभोरे, पोलिस शिपाई विठ्ठल खार्डे यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅटिंग व झालेल्या संभाषण न्यायालयात महत्त्वाचे ठरले. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर न करता ऑनलाइन हियरिंग झाली. अटी-शर्तीच्या अधीन राहून न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. लाच घेणारा व त्यास मदत करणाऱ्या दोन्ही कर्मचाऱ्यांचे पोलिस अधीक्षकांकडून निलंबन करण्यात आले आहे.

एका दाखल झालेल्या गुन्ह्यातील अॅट्रॉसिटीच्या प्रकरणात मदत करण्यासाठी २ लाखांची लाच पोलिस नाईक संतोष अंभोरे यांनी कडवंची येथे जाऊन स्वीकारली होती. या प्रकरणात उपविभागीय अधिकारी सुधीर खिरडकर, पोलिस शिपाई विठ्ठल खार्डे यांना अटक करण्यात आली होती. दोन दिवस त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेे. मध्यंतरी खिरडकर यांची तब्येत खालावल्याने त्यांच्यावर औरंगाबादेत कैदी उपचारासाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान, सोमवारी तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाकडून तिघांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मूळ फिर्यादीस संपर्क न करणे, आयओंशी संपर्क न करणे यासह इतर हस्तक्षेप न करणे आणि १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाकडून जमानत करण्यात आल्याची माहिती सरकारी वकील दीपक कोल्हे यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी असलेले पोलिस नाईक संतोष अंभोरे आणि विठ्ठल खार्डे यांना पोलिस अधीक्षकांकडून निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, खिरडकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विविध संघटनांकडून होत आहे.

पोलिसांचा तगडा बंदोबस्त

खिरडकर यांना हेअरिंगसाठी न्यायालयात आणण्यात आणणार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी झाली होती. काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जवळपास १०० पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खिरडकर यांच्या निलंबनासाठी अनेक संघटनांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. तसेच काही ठिकाणी काळे फासण्याचाही प्रकार होणार होता.या अनुषंगाने न्यायालयाबाहेर तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परंतु, ऑनलाइन हेअरिंग होणार असल्याची माहिती मिळताच सर्व बंदोबस्त काढण्यात आला. दुपारनंतर ऑनलाइन हेअरिंग होऊन जामीन मंजूर करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...