आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजुरी:जालना शहराला लागले महानगरपालिकेचे वेध ; मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर नव्याने हालचाली

जालना / लहू गाढे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहराला महापालिका हवी, अशा मागणीचा ठराव पालिकेने पाठवला तर त्याला तत्काळ मंजुरी देता येईल, असे आदेश २०२१ मध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २०२१ मध्ये जालन्याचा आढावा घेताना दिले होते. शिंदे अजूनही त्यास अनुकूल असल्याचे लक्षात आल्यावर जालनावासीयांना मनपाचे वेध लागल्याचे दिसत आहे.

हिंदू महासभेने नुकतेच या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्रालयाला पाठवले आहेे. त्याचा गवगवा झाल्यावर चर्चेला वेग आला आहे. या संदर्भात ‘दिव्य मराठी’ने प्रमुख राजकीय पक्षांतील नेत्यांची मते जाणून घेतली असता भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीकडून महापालिका करण्यास होकार, तर काँग्रेसकडून नकाराचा सूर लावला जात आहे. आमदार कैलास गोरंट्याल म्हणाले की, महापालिका अस्तित्वात आल्यावर कराचा बोजा वाढणार आहे. भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत यांनी मनपा असावी, असे सांगताना सध्याही लोकांची कामे होत असल्याचा दावा केला.

बातम्या आणखी आहेत...