आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अट्टल घरफोड्या पोलिसांच्या ताब्यात:योग्य दिशेने तपास करुन भोकरदन पोलिसांनी जळगावातून चोरट्याला ठोकल्या बेड्या

महेश देशपांडे/भोकरदन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तपासाची चक्रे वेगाने फिरवत भोकरदन पोलिसांच्या विशेष पथकाने भोकरदन शहरातून नुकत्याच सहा दुकानफोड्या करून फरार झालेल्या अट्टल घरफोडया आरोपी पप्पू रणछोड पाटील याला जळगाव पोलिसांच्या साहाय्याने अटक करून पोलीस ठाण्यात आणले, अशी माहिती पो.नि रत्नदीप जोगदंड यांनी दिली आहे.

भोकरदन शहरात शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने मुख्य रोडवरील इकबाल यांचे दुकानाचे पत्रे उचकटून दुकानातील सुमारे तीस हजार रुपयांचा ऐवज चोरी करून नेला होता. याबाबत पोलिस ठाणे भोकरदन येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी भोकरदन इंदलसिंग बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भोकरदनचे सपोनि आर बी जोगदंड व त्यांचे पथकाने घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळावर उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे झालेल्या चोरीचा तांत्रिक तपास केला असता सदर ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपीच्या हरकती दिसून आल्या होत्या. त्यावरून भोकरदन पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन आरोपी प्रवीण उर्फ पप्पू रणछोड पाटील राहणार बीडगाव तालुका चोपडा जिल्हा जळगाव यास दिनांक 20 रोजी जळगाव येथून ताब्यात घेतले व त्यास पोलीस ठाणे भोकरदन येथे आनण्यात आले.

सदर आरोपीकडे भोकरदन पोलिसांकडून कसोशीने विचारपूस करून गुन्ह्यातील चोरी झालेला माल हस्तगत करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...