आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:भोकरदन शहराजवळ साडे दहा लाखांचे अवैध बायोडिझेल जप्त, महसूल व पोलिसांची संयुक्त कारवाई

महेश देशपांडे | भोकरदन9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 ते 14 हजार लिटर बायोडिजेल होते, 75 रु. भावाने विक्री सुरू होती.
  • अधिकृत डिजेल व बायोडिझेलच्या भावात 20 ते 25 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे वाहनधारक याची खरेदी करीत होते

भोकरदन-सिल्लोड रोडवर शहरापासून 3 कीमी आंतरावर इब्राहिमपूर शिवारात अवैधरित्या साठवून बायोडिझेलची विक्री करीत असलेल्या ठिकाणावर आज (गुरुवारी) मिळालेल्या गुप्त माहितीवरून भोकरदन येथील महसूल व पोलीसांच्या संयुक्त पथकाने छापा मारून कारावाई करीत सहा सेंटेक्स टाक्या व एक टँकरमध्ये साठवून ठेवलेले साडे दहा लाख रुपये किमतीचे अवैध बायोडिझेल जप्त केले आहे.

आरोपी अब्दुल रहीम याच्या विरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती छापा पथक प्रमुख व पुरवठा विभागाचे नायबतहसीलदार बालाजी पपुलवाड यांनी दिली.

भोकरदन शहर परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून खुलेआम हायवेवर आवैधरित्या बायोडिझेल विक्री सुरू होती. याबाबत नुकतेच पेट्रोल पम्प चालक संघटनेने प्रशासनाला संबंधित प्रकार निदर्शनास आणून दिला होता. त्या अनुषंगाने नुकतेच जालना येथे व भोकरदन येथे महसूल पोलिस प्रशासनाने अवैध डिझेल माफियाविरुद्ध कारवाई करून साठा व साहित्य जप्त केले आहे. या कारवाईमुळे अवैध बायोडिझेल विक्री करणारे माफिया चांगलेच हादरले आहे.

भोकरदन येथे कारावाई केलेल्या संयुक्त पथकात प्रमुख नायब तहसीलदार बालाजी पप्पूलवाड, तलाठी संदीप लाड, तलाठी कल्याण माने, चालक गणेश वाघमारे व पोलिस कर्मचारी समाधान जगताप कॉन्स्टेबल, विकास जाधव शिवाजी तेलंगरे कोतवाल सहाभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...