आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानात्यातील मुलासोबत मुलगी पळून गेली. त्यामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या रागात वडील व काकाने मुलीला झाडाला गळफास देऊन तिचा खून केला. बुधवारी घडलेल्या या घटनेतील संशयित आरोपींची शुक्रवारी ६ तास चंदनझिरा ठाण्यात चौकशी करण्यात आली. दरम्यान, ज्या तरुणासोबत मुलीचे लग्न होणार होते, त्या प्रियकराला शनिवारी ठाण्यात चौकशीसाठी आणणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
सूर्यकला ऊर्फ सुरेखा संतोष सरोदे (१७) हिला फाशी देऊन मारल्यानंतर वडिल व काकाने कुक्कुटपालन शेडच्या आडोशाला अंत्यविधी उरकून टाकला. प्रियकराने क्लू दिल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास केला व वडील संतोष भाऊराव सरोदे, काका नामदेव भाऊराव सरोदे या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास गणेश झलवार हे करत आहेत.
डॉ. नीलम गोऱ्हे यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन मुलीच्या हत्या केल्याप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्र्यांना शुक्रवारी निवेदन दिले आहे. आरोपींना लवकर व कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनी तपास लवकर करून चार्जशीट न्यायालयात दाखल करावी. अशा घटना टाळण्यासाठी सामाजिक स्तरावर जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.