आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र गॅझेट:जालना जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेट करण्यात यावे : रामभाऊ लांडे

अंबड9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना जिल्हा निर्मितीची अधिकृत घोषणा १ मे १९८१ तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर अंतुले यांनी केली होती. यास ४१ वर्षे पुर्ण झाले असुन यादरम्यानच्या काळात जालना जिल्ह्याचा भौगोलिक तथा औद्योगिक विकास झाला आहे. मात्र जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेट आणि वस्तू संग्रहालय झालेले नाही जिल्ह्याचे स्वतंत्र गॅझेट करण्यात यावे अशी मागणी इतिहास संशोधक रामभाऊ लांडे जिल्हाधिकारी जालना यांची भेट घेवून निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा असुन रामायण, सातवाहन, वाकाटक, यादव,मराठा, निजाम कालखंडात हिवरडी, हिवराळी, जालहनापुर, जालनापुर, जालना असा प्रवास झालेला आहे. जालना जिल्ह्यात गोदावरी परिसरात तसेच विविध ठिकाणी कोरीव लेण्या, मंदिर, घाट, किल्ले, बारवा, प्रवेशद्वार, मशिद, दर्गा, तलाव आदी निर्माण झालेले आहेत. या सर्व माहितीचे स्वतंत्र शासकीय गॅझेट व्हावे सध्या जालना जिल्ह्याची माहिती औरंगाबाद गॅझेट मधे उपलब्ध आहे त्यात भर घालुन स्वतंत्र माहितीचे जालना जिल्हा गँझेट प्रकाशित करण्यात यावे. असे निवेदनात म्हटले.

बातम्या आणखी आहेत...