आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बळीराजाची व्यथा:शेतकरी होण्याची खंत वाटते, आतापर्यंत एका रुपयाचाही माल विकला नाही, गारपिटीमुळे द्राक्ष बागा पूर्णपणे नष्ट

जालना14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालन्यातील कडवंची येथील उमा क्षीरसागर यांची द्राक्ष बाग गारपिटीमुळे पूर्ण नष्ट झाली आहे.

'आता शेतकरी होण्याची खंत वाटतेय. गारपिटीने द्राक्षबागांना पूर्णपणे झोडपले आहे. आमच्या बागेत जवळपास 200 क्विंटल द्राक्षांचे घड होते. आतापर्यंत एक रुपयाचाही माल विकलेला गेला नाही. त्यापूर्वीच अवकाळीने घास हिरावून नेला आहे'. ही व्यथा आहे द्राक्ष हब म्हणून ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातील कडवंची गावच्या द्राक्ष उत्पादक उमा क्षिरसागर यांची.

द्राक्ष हबवर सडवा रोगाचा प्रादुर्भाव

गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जालन्याचे द्राक्ष हब संकटात सापडले आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे जालन्यातील द्राक्ष‎ हबवर सडवा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने‎ द्राक्ष उत्पादक त्रस्त झाले होते. या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना शनिवारी बेमोसमी ‎पाऊस तसेच गारपिटीने जवळपास अर्धा‎ तास झोडपले. यामध्ये द्राक्षबागा पूर्णपणे ‎झोडपल्या गेल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.‎

वातावरण बदलात अवकाळीचे संकट

जालना तालुक्यातील कडवंची तसेच परिसरातील अंभुरेवाडी, धारकल्याण,‎ नाव्हा, नंदापूर, वडगाव वखारी आदी‎ गावांत द्राक्षबागेची मोठी शेती आहे. मागील पंधरवड्यापासून वातावरणात‎ बदल होत असल्याने द्राक्षबागांवर भुरीचा‎ प्रादुर्भाव वाढला हाेता. यावर नियंत्रण‎ मिळण्याचा प्रयत्न सुरू असताना मागील‎ तीन दिवसांपासून सुरू असलेल्य‎ ‎ बेमोसमी पावसाची भर पडली.

गारपिटीमुळे बागा पूर्णपणे नष्ट

शनिवारच्या गारपिटीमुळे द्राक्ष बागा पूर्णत: नष्ट‎ झाल्याचे कडवंची येथील‎ शेतकरी बालाजी कुदळे, उमा क्षीरसागर‎ यांनी सांगितले.‎ द्राक्षांच्या‎ घडावर पडणाऱ्या पावसामुळे द्राक्षांचे मणी फुटून सडवा‎ लागल्याने 70 टक्क्यांवरील उत्पादनाला‎‎ फटका बसला आहे. असे असताना‎ शनिवारी मोठ्या प्रमाणात बेमोसमी‎ पावसासह गारपीट झाली. यामध्ये‎ कडवंची, नदापूर, अंभोरेवाडी, नंदापूर,‎ धारकल्याण, भोरखेडी, न्हावा तसेेच‎ वरूड या गावांना फटका बसला. आतापर्यंत पाच ते‎ दहा रुपये किलो जाईल, असा तरी माल‎ होता. मात्र, तो आता पूर्ण नष्ट झाला आहे, असे शेतकरी उमा क्षीरसागर यांनी सांगितले.

शंभर टक्के नुकसान‎

कडवंची येथील शेतकरी नागेश अंभोरे यांनी सांगितले की, मागील पंधरा दिवसांपासून संकट सुरू‎ होते. शनिवारी कहर पाहायला मिळाला.‎ तब्बल अर्धा तास बोरांसारखी गारपीट‎ झाल्याने द्राक्षबागा पूर्णपणे नष्ट झाल्या‎ आहेत.

संबंधित वृत्त

अवकाळी वरवंटा:पंचनामे अडकले संपात, दुप्पट मदतीचा निर्णय पाडव्यानंतरच; सलग चौथ्या दिवशी गारपिटीमुळे पिके उद‌्ध्वस्त

राज्यात १५ मार्चपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस व गारपिटीच्या संकटाने हजारो हेक्टर शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सलग चौथ्या दिवशीही मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला. वीज कोसळून विदर्भात दोघांचा व नाशिक जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी मराठवाड्यात पाच जणांचा बळी गेला होता. रविवारीही काही भागात पाऊस व गारपिटीचा अंदाज आहे. सोमवारनंतर मात्र हे अवकाळी संकट सरेल, अशी शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली. वाचा सविस्तर

बातम्या आणखी आहेत...