आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:जालना गणेश फेस्टिव्हलचे मोलाचे स्थान

जालना22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील जालना गणेश फेस्टिव्हलची संयोजक मंडळी ही सांस्कृतिक व सामाजिक कार्यात अग्रेसर असून, जालना गणेश फेस्टिव्हलने मोलाचे स्थान निर्माण केले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. जालना येथे सुरू असलेल्या गणेश फेस्टिव्हलदरम्यान रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख डॉ. हिकमत उढाण, माजी आमदार शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए. जे. बोराडे, संतोष सांबरे, रमेश गव्हाड, फेस्टिव्हलचे अध्यक्ष भास्कर दानवे, डॉ. संजय लाखे, अशोक पांगारकर, सुभाष कोळकर, अशोक उबाळे, किरण गरड, ज्ञानेश्वर कदम, सुरेश मुळे, संदीप पाटील, अजिंक्य घोगरे, प्रा. राजेंद्र भोसले, शशिकांत घुगे, सतीश जाधव, धनंजय काबलिये, प्रसाद वाढेकर आदींची उपस्थिती होती. आमदार दानवे म्हणाले, गणेश फेस्टिव्हलच्या उपक्रमाचे कौतुक करून गणेश फेस्टिव्हलच्या माध्यमातून सामाजिक सलोखा जपला जात असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सुभाष कोळकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र भोसले यांनी, तर संदीप पाटील यांनी आभार मानले. यावेळी सुनील पवार, रमेश गजर, विकास पाटील, संदीप जगताप, शक्ती कावळे, पंडित शिंदे, ज्ञानेश्वर मदन, किरण शिरसाट, शिवराज जाधव होते.

बातम्या आणखी आहेत...