आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Aurangabad
 • Jalna
 • Jalna Manmad Electfication Train Ruts | Marathi News | Raosahev Danve | Nanded Manmad Electrification To Start Within A Week; Information Of Minister Of State For Railways Danve

प्रवाशांची सोय:नांदेड-मनमाड विद्युतीकरणास आठवडाभरामध्ये होणार प्रारंभ; रेल्वे राज्यमंत्री दानवे यांची माहिती

जालना6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचे निघाले टेंडर
 • रडार यंत्रणेद्वारे होणार जालना-जळगाव रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण
 • विद्युतीकरणाचे काम २०२३ अखेरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केलेली वंदे भारत रेल्वे मराठवाड्यातून धावली पाहिजे म्हणून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी तयारी सुरू केली आहे. त्यासाठी नांदेड-मनमाड मार्गाचे विद्युतीकरण केले जात आहे. या कामाची सर्व तयारी झाली असून पुढील आठवड्यातच कामाला सुरुवात होणार आहे. दुसरीकडे जालना-जळगाव रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाचेही काम सुरू होणार असून यासाठीच्या साडेचार कोटी रुपयांच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी “दिव्य मराठी’शी बोलताना ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “वंदे भारत’ या रेल्वे योजनेची घोषणा केली आहे. मात्र, ही रेल्वे केवळ विद्युतीकरण असलेल्या मार्गावरच चालते. त्यामुळे डिझेल इंजिन असलेल्या रेल्वे ट्रॅकचा “वंदे भारत’साठी उपयोग होत नाही. म्हणून नांदेड-मनमाड या मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम वेगाने पूर्ण केले जाणार आहे. जालना ते नांदेड आणि जालना ते मनमाड अशा दोन टप्प्यांत हे काम केले जात आहे. पुढील आठवड्यात या कामाचा प्रारंभ होणार असल्याचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले. जालना ते जळगाव हा तब्बल १७४ किलोमीटरचा रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. यापैकी ४० किलोमीटरचा रेल्वेमार्ग हा जालना लोकसभा मतदारसंघातून जातो. त्यामुळे जालना जिल्ह्याच्या दृष्टीने हा रेल्वेमार्ग अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे. जे काम पूर्ण होऊ शकते, त्याच्या कामाची आपण घोषणा करतो.

जालना-जळगाव रेल्वेमार्गाची घोषणा करताना संपूर्ण विचार करून आपण ही घोषणा केली होती. त्यामुळे हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याला आपले प्राधान्य असल्याचे मंत्री दानवे यांनी सांगितले. या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी चार कोटी ५० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. दरम्यान, आता या सर्वेक्षणाच्या टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता सर्वेक्षणाचे काम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे काम तातडीने आणि अचूक पद्धतीने पूर्ण व्हावे म्हणून रडार यंत्रणेद्वारे हे सर्वेक्षण केले जाणार असल्याचे रावसाहेब पाटील दानवे यांनी सांगितले. विद्युतीकरणाच्या सर्वेक्षणाचे काम लवकरात लवकर करण्याचा मानस राज्यमंत्री दानवे यांनी व्यक्त केला.

काय आहे वंदे भारत रेल्वे

वंदे भारत ही सेमी हायस्पीड रेल्वे आहे. साधारणतः १३० ते १८० किलोमीटर प्रतितास या वेगाने ही रेल्वे धावते. प्रामुख्याने दोन शहरांमध्ये ही रेल्वेसेवा दिली जाते. इलेक्ट्रिक इंजिनला ही रेल्वे जोडलेली आहे. सध्या देशातल्या काही प्रमुख शहरांमध्ये ही रेल्वे जोडलेली आहे.

मराठवाड्यातील रेल्वेमार्गावर असा होणार फायदा

 • विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेचा वेग प्रतितास साधारणतः १२० ते १३० किमी असेल.
 • या मार्गावर काही नव्या रेल्वे सुरु करता येतील यात प्रामुख्याने इंटरसिटी ट्रेनचा समावेश असेल.
 • लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरू होण्यासाठी दुहेरीकरणाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.

जालना पिटलाइनला मंजुरी
रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी महिनाभरापूर्वी जालना येथे पिटलाइन होणार असल्याची घोषणा केली होती. शंभर कोटी रुपयांच्या या पिटलाइनमुळे जवळपास एक हजार लोकांना रोजगार मिळणार आहे. या पिटलाइनला आता मंजुरी मिळाली असल्याची माहिती दानवे यांनी दिली. विशेष म्हणजे जालना येथे पिटलाइन होत असताना चिकलठाणा येथील पिटलाइन रद्द झाली असे समजू नये, असेही दानवे यांनी सांगितले.
---

बातम्या आणखी आहेत...