आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:जुन्या वादातून येथे खून; एक संशयित ताब्यात, जालन्यात मोहाडी येथील घटना

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुन्या कौटूंबिक वादातून डोक्यात रॉड किंवा शॉर्ट गनचा वापर करुन खून करण्यात आल्याची घटना जालना तालुक्यातील मोहाडी येथे रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. छबु राठोड (५४) असे मयताचे नाव आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा विनायक छबु राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खुन झाल्याची माहिती मिळताच डिवायएसपी मोरे, सहायक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे, मौजपुरीचे विलास मोरे यांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उबाळे हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. विनायक राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अजयसिंग नाथ सिंग उर्फ सर्जेराव राठोड याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक नित्यानंद उबाळे यांनी दिली. एका संशयिताला ताब्यात घेऊन चौकशी सुरु आहे.

मुख्य आरोपी अजयसिंग नाथ सिंग उर्फ सर्जेराव राठोड तीन वर्षापूर्वीच एका गुन्ह्यातून जेलबाहेर आला आहे. त्याला जेलबाहेर आणण्यासाठी मयत छबू राठोड यांनी मदत केली होती. कौटूंबिक वादातून हा खून झाला असल्याची तक्रार मयताच्या मुलाने दिली आहे. यानुसार तपास सुरु आहे. लवकरच आरोपीला ताब्यात घेत आहोत, अशी माहिती उबाळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...