आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळिमा:प्रियकराच्या मदतीने आईनेच सहा वर्षीय मुलाचा केला खून, तोंडात बोळे कोंबून चिरला गळा

अंबडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहावर्षीय मुलगा प्रेमात अडसर ठरत असल्याने आईने प्रियकराच्या मदतीने मुलाच्या तोंडात बोळे कोंबून त्याचा गळा चिरत खून केल्याची घटना अंबड-घनसावंगी रोडवर बुधवारी येथे उघडकीस आली. आदित्य असे मृत मुलाचे तर नवनाथ जगधने (२४, पैठण) असे प्रियकराचे नाव आहे. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी महिलेने मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. १२ तासांतच पोलिसांनी गुन्हा उघड केला.

अंबड तालुक्यातील डावरगाव येथील एक महिला व तिच्या जावेला अंबड येथील डॉ. कासलीवाल यांच्या खासगी रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन आली होती. त्या वेळी तिच्यासोबत तिचा ६ वर्षांचा मुलगा आदित्यदेखील होता. डॉक्टरांनी दिलेली औषधी आणण्यासाठी मेडिकलवर गेले असता मुलगा बेपत्ता झाल्याची खोटी तक्रार तिने अंबड पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री दिली होती. शोध घेताना पोलिसांना अंबड शहरापासून घनसावंगी रोडवर एका मुलाचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे, पोलिस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या महिलेसह मजुरी करणाऱ्या प्रियकरास पोलिसांनी जेरबंद केले.

चौकशीवेळीच संशय आला
महिलेने फिर्याद देतानाच पोलिसांना काही प्रमाणात संशय आला. महिलेने प्रियकराचा नंबर दिलेला होता. त्यावर फाेन करून चाैकशी केल्यानंतर हा प्रकार समाेर आला. प्रियकर व त्या महिलेच्या प्रेमात अडसर ठरत असल्याने त्या महिलेने त्या मुलाचा खून केल्याची कबुली दिली. - सुभाष भुजंग, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जालना.

बातम्या आणखी आहेत...