आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसैनिकाचा मृतदेह सापडला:जालन्यातील 500 फूट खोल दरीत कारमध्ये सापडला शिवसैनिकाचा सांगाडा; जाळून हत्या केल्यानंतर कारमध्ये मृतदेह ठेवल्याचा संशय

जालना6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माहिती कळताच माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी घटनास्थळी भेट दिली

जालना जिल्ह्यातील सेवली ते पाहेगाव रोडवरील 500 फूट एका खोल दरीमध्ये कारमध्ये जळालेल्या अवस्थेत रमेश शेळके (50) यांचा मृतदेह आढळून आला आहे. आज (सोमवार, 8 फेब्रुवारी) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. जालना तालुक्यातील पाडेगाव येथील रमेश शेळके यांचा हा मृतदेह आणि आणि जगावे ही गाडी असल्याचे समजते.

दोन दिवसांपासून बेपत्ता होते रमेश शेळके
दोन दिवसांपासून बेपत्ता होते रमेश शेळके

ही गाडी शेळके यांच्या मालकीची असून, ते दोन दिवसांपासून गायब होते. मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर रक्ताने माखलेला दगड, रुमाल आणि खिशातील पाकीट आढळून आला आहे. पाकिटातील ओळखपत्र वरून हा मृतदेह रमेश शेळके यांचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मयत शेळके शिवसैनिक असून, घटनेची माहिती कळताच माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. परतूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी इंदलसिंग बहुरे, यांच्यासह सेवली पोलीस ठाण्याचे सपोनि वीलास मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...