आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना:...अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर तो वाहून गेला, पुराच्या पाण्यात धाडस करणे बेतले जीवावर

​​​​​​​जालना (कृष्णा तिडके )2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सावंगी अवघडराव परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला होता.

तालुक्यातील सावंगी अवघडराव येथे मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील नदी नाल्यांना मोठा पूर आला. यात सावंगी अवघडराव येथील पुलावरून रस्ता पार करतांना एक वीस वर्षीय तरुण वाहून गेला आहे.

सावंगी अवघडराव परिसरात मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस झाला त्यामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला होता. दरम्यान सावंगी अवघडराव येथील सय्यद शाहेद सय्यद सईद (वय 20 वर्ष) आणि सलीम सय्यद (वय 30 ) हे दोघे धाड येथून गॅरेज वर काम करून गावी परत येत होते. यावेळी पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही पुलावरून वाहून गेले. मात्र यावेळी नदी काठावर उभ्या असलेल्या ग्रामस्थांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उड्या टाकल्या आणि त्या दोघांना वाचवण्यासाठी धडपड केली. त्यात सलीम सय्यद यास पुरातून वर काढण्यात ग्रामस्थांना यश आले. मात्र सय्यद शाहेद याचा उशिरापर्यंत शोध लागला नव्हता.