आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंच्या हाती ट्रॅक्टरचे स्टेअरिंग:केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा चक्क ट्रॅक्टर चालवत भोकरदनच्या रस्त्यांवर फेरफटका

महेश देशपांडे/भोकरदन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रात मोदी सरकारमध्ये रेल्वेचा कारभार सांभाळत मराठवाड्यातून बुलेट ट्रेन नेण्याचे स्वप्न पाहणारे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी सकाळी भेटीला आलेल्या शेतकरी शरद घायवट यांच्या नव्या ट्रॅक्टरचे स्टेअरिंग हाती घेऊन भोकरदन शहरातील रस्त्यावर फेरफटका मारला रस्त्यात चौकात थांबून लोकांशी संवाद देखील साधला.

केंद्रात रेल्वे, कोळसा, खनिकर्म राज्यमंत्री पदाचा कारभार हाती आल्यापासून रावसाहेब दानवे जास्तकाळ दिल्लीतच असतात. याशिवाय देशातील विविध राज्यात त्यांचे दौरे सुरू आसतात. त्यामुळे वेळ आणि संधी मिळेल तेव्हा ते पुन्हा भोकरदनला घरी येतात आणि घरी, आल्यावर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये रमतात. दानवे नुकतेच दिल्लीतून भोकरदनला परतले. मंत्रीपदाचा बडेजाव न बाळगता रोजच्या प्रमाणे भेटीगाठी, गप्पा आणि मतदारसंघातील विविध कामांचा आढावा घेतात.

दानवेंचे ट्रॅक्टर प्रेम पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी

शुक्रवारी सकाळी शेतकरी व कार्यकर्ता शरद घायवट, रावसाहेब दानवेंच्या बंगल्यावर आपला ट्रॅक्टर घेऊन आले होते. तो ट्रॅक्टर पाहून दानवेंना तो चालवण्याचा मोह काही आवरला नाही. ट्रॅक्टरवर दानवे स्वार झाले, गेअर टाकला आणि ट्रॅक्टर थेट बंगल्याच्या बाहेर घेऊन त्यांनी भोकरदनच्या रस्त्यावरून चालवला. बंगल्यापासून ते सिल्लोड रोडवरील आंबेडकर चौकापर्यंत ट्रॅक्टर चालवला. त्या कार्यकर्त्यालाही आपल्या साहेबांनी ट्रॅकटर चालवल्याचा आनंद झाला. दानवेंच्या या ट्रॅकटर चालवण्यामुळे त्यांच्यासाठी बंदोबस्तात असलेल्या यंत्रणेची मात्र चांगलीच धावपळ उडाली. दानवे यांचे हे ट्रॅक्टर प्रेम पाहण्यासाठी भोकरदनच्या रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...