आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानवेंचे प्रत्युत्तर:आवश्यकतेनुसार कोळसा असताना मंत्री म्हणतात कोळसा नाही, राज्य सरकार जनतेची दिशाभूल करतेय- दानवे; जनतेचा नव्हे राज्य सरकारचा बंद असल्याचीही टीका

भोकरदन / महेश देशपांडे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकार प्रत्येकवेळी कोणत्याही कारणासाठी केंद्र सरकारवर आरोप करत सुटते. मग ते कोरोना परिस्थिती असो, शेतकऱ्यांचे नुकसान, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या सर्वांसाठी केंद्र सरकारच जबाबदार, असे बोलण्याचा त्यांना हा एकमेव छंद लागलेला आहे, असा टोला रावसाहेब दानवे यांनी पत्रातून लगावला आहे.

देशातील सर्व राज्य सरकारकडून कोळशाची मागणी होते आहे. त्यानुसार पुरवठा करण्यात येतो आज आवश्यकतेनुसार भरपूर प्रमाणात कोळसा उपलब्ध असताना राज्याचे मंत्री म्हणतात कोळसा नाही महाराष्ट्र सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे, असे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खान राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या वतीने ऑनलाइन जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रात म्हटले आहे.

या प्रसिद्धी पत्राद्वारे नुकतेच राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कोळशाच्या उपलब्धते संदर्भात केंद्र सरकारवर केलेल्या आरोपाचे दानवे यांनी खंडन करून राऊत यांना योग्य प्रतिउत्तर देत देशातील उपलब्ध कोळशाच्या सद्यसाठा स्थितीचा आहवालच सादर केला आहे.

देशात चाळीस लाख मेट्रिक टन कोळसा भांडारात उपलब्ध आहे. कोळसा खाण केंद्रावर सात लाख मेट्रिक टन कोळसा अतिरिक्त साठवलेला आहे. भयंकर पाऊस झाल्यानंतर सुद्धा आमच्या कामगार व अधिकार्‍यांनी रात्रंदिवस अतिशय जोखीम घेऊन सातत्याने मेहनतीने प्रयत्न करत काम करून पूर्वीपेक्षा अधिक प्रमाणात कोळशाचे उत्पादन केले आहे, असे दानवे म्हणाले.

जनतेचा नव्हे राज्यसरकारचा बंद -
महाराष्ट्र बंद हा राज्य सरकारचा बंद होता, पोलिस लोकांना मारत होते दुकाने पोलीसांनी बंद केली. हा जनतेचा बंद नव्हता सरकारचा बंद होता. मानव अधिकाराचे उल्लंघन झाले आहे. बलात्काराच्या सर्वाधिक केसेस महाराष्ट्रात आहेत राज्य सरकारचे त्याकडे अजिबात लक्ष नाही शेतकऱ्यांना दिलासा नाही ज्याकडे लक्ष द्यायचे तिकडे यांचे लक्ष नाही आणि उत्तर प्रदेश, बिहार, कोलकाताची हे कॉपी करत बसलेत हे कॉपी सरकार आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...