आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे हाल:जालना-सेवली सकाळची बससेवा बंद;  प्रवाशांसह व्यापारी, विद्यार्थ्यांचे हाल

सेवली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना तालुक्यातील सेवली मोठया बाजारपेठेचे गाव आहे. जालना आगारातून सेवली येथे सकाळी साडेआठ वाजता येणारी बस मागील पाच महिन्यांपासून बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. सध्या जालना-लोणार ही बस साडेआठ वाजता सेवलीत येते आणि सेवलीतून लोणारला जाते तिला परत सेवलीत येण्यासाठी अकरा वाजतात. त्यामुळे येथील प्रवाशांना जालन्यास जाण्यासाठी विलंब होतो. कारण तालुक्याचे गाव जालना असल्याने तहसील, जिल्हा परिषदेची प्रशासकीय कामे, दवाखाना, व्यापार आदी कामांसाठी येथील ग्रामस्थांना दररोज जावेच लागते.

या आधी सकाळी साडेआठ वाजता जालन्यासाठी बससेवा सुरु होती. ती बंद करण्यात आल्याने अडचणीचे ठरत आहे. याचा विद्यार्थी, व्यापाऱ्यांना त्रास होत आहे. सदरील बससेवा सुरु करण्यासाठी सरपंच शेख नावीद यांनीही निवेदन देऊन पाठपुरावा केलेला आहे. परंतु काहीच कार्यवाही झाली नाही. वरिष्ठांनी लक्ष देऊन जालना ते सेवली बससेवा पूर्ववत करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

बातम्या आणखी आहेत...