आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:जालन्याच्या तरुणाची रेल्वेखाली आत्महत्या, स्कूटी रस्त्यावर लावून धावत रेल्वे रुळावर जाऊन राहिला उभा

जालनाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अमित चव्हाण - Divya Marathi
अमित चव्हाण

धावत्या रेल्वेसमोर येत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना जालना शहरातील मुक्तेश्वर तलावाजवळील रेल्वे रुळावर सोमवारी सव्वाअकरा वाजेच्या सुमारास घडली. अमित राजकुमार चव्हाण (२०, सटवाई तांडा, जालना) असे मृत तरुणाचे नाव आहे.

औरंगाबादकडून सचखंड रेल्वे भरधाव येत होती. मुक्तेश्वर तलावाजवळ अचानक हा स्कूटी रस्त्यावर लावत धावत जात अमित हा रेल्वेसमोर जाऊन उभा राहिला. रेल्वेच्या धडकेने त्याच्या शरीराचे तुकडे झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस व कदीम ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. मृतदेह बाजूला घेऊन बॅगमधील आधार कार्ड पाहून ओळख पटवण्यात आली. याप्रसंगी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मृताचे नातेवाईक घटनास्थळी आल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, पोलिस आल्यानंतर मृतदेहाचे विखुरलेले अवयव जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

दरम्यान, मृताच्या बॅगमध्ये असलेल्या कागदपत्राच्या आधारे ओळख पटवण्यात आली. घटनास्थळी मृताच्या शेजारी राहत असलेल्या एका व्यक्तीने ओळख पटवल्यानंतर मृताच्या घरी याची माहिती देण्यात आली. मृतदेहाचे तुकडे बाजूला घेण्यात आल्यानंतर दुसरी रेल्वे गेली. मृताच्या शरीराचे काही भाग छिन्नविछिन्न होऊन वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. मृताच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केला होता.