आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजालना शहराचा व्याप, लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, जालनेकरांना अजूनही १० ते १५ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दरम्यान, शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका, सीना नद्या एकप्रकारे रक्तवाहिन्या आहेत. यामुळे या दोन्ही नद्या स्वच्छ राहण्यासाठी जालनेकरांनी काय करावे, याबाबत १३ मिनिटांच्या पथनाट्यातून जालन्यात जनजागृती केली जात आहे.
जालना शहरातून वाहणाऱ्या कुंडलिका आणि सीना नद्यांचे देसाई ट्रस्टसह सामाजिक संस्थांकडून तसेच कुंडलिका-सीना रिज्युवनेशन व डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने कुंडलिका व सीना नदीपात्रांचे खोलीकरण, रुंदीकरण सुरू असल्याने दोन्ही नद्यांच्या पात्रात मोठी वाढ झाली आहे.
पाऊस पडण्यापूर्वी जास्तीत जास्त काम व्हावी म्हणून जेसीबी, ट्रॅक्टरने काम केले जात आहे. दिवसरात्र हे काम सुरू आहे. या कामांमुळे नद्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. आता नदीचे पात्र रुंदीकरण व खोलीकरणामुळे विस्तीर्ण झाले आहे. पावसाळ्यात पाण्याने भरल्यानंतर हे पात्र सुंदर दिसेल. जालनेकरांनी देखील या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभाग नांेदविला आहे. दरम्यान, कुंडलिका नदीत स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी विनोद जैथमहाल यांच्यासह त्यांचे सहकारी जालनेकरांमध्ये जनजागृती करीत आहेत. या उपक्रमासाठी जिल्हाधिकारी विजय राठोड, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील नागरिक परिश्रम घेत आहेत. समस्त महाजन ट्रस्टच्या वतीने पुढाकार घेऊन प्रशासनाच्या मदतीने कुंडलिका-सीना नदी पुनरुज्जीवन अभियान राबविले जात आहे.
विविध भागात केल्या जातेय पथनाट्य : ही कुंडलिका ही सीना, या आमच्या गंगा यमुना, स्वप्न उद्याचे स्वच्छ नव्याचे, करू साकार पुन्हा या मथळ्याखाली गाणेही तयार केल्याने जालनेकरांचा याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. कुंडलिका नदीपात्रात महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सामूहिक श्रमदान केले जात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.