आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत केंद्रीय संचार ब्युरोचे औरंगाबाद क्षेत्रीय कार्यालय, दक्षिण मध्य रेल्वे व जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जालना रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर केंद्र सरकारच्या आठ वर्षपुर्तीनिमित्त शासकीय जनकल्याण योजना व गतिशक्ती विषयावर १७ ते २१ डिसेंबरदरम्यान आयोजित मल्टीमिडिया चित्रप्रदर्शनी पाहण्यासाठी जालनेकरांची शनिवारी रीघ पाहावयास मिळाली. या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी जिल्हा परिषद प्रशाला ते रेल्वेस्टेशनपर्यंत रॅली काढण्यात आली. यात जिल्हा परिषद प्रशाला, दानकुंवर महिला महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे ५०० विद्यार्थी सहभागी झाले होते. सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, जालना) संपत चाटे, रेल्वे स्टेशन प्रबंधक विनोद कुमार भारती, लीड बँक मॅनेजर प्रेषित मोघे, केंद्रीय संचार ब्युरो औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, पोस्ट विभागाचे डेव्हलपमेंट ऑफिसर श्रीकुमार मुंडे, आरडी पोस्ट एजंट कल्याण कवडे, पप्पू देशमुख, अर्चना सांगुळे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनांचे जिल्हा कॉर्डिनेटर मुरलीधर वर्मा, लीड बँक- जनधन योजना प्रसिद्धी इन्चार्ज कैलास तावडे, महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था कार्यालय सहाय्यक अनुराधा बोराडे, धरती धन ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष मिलिंद सावंत आदींची विशेष उपस्थित होते.
प्रदर्शनाला नागरिकांनी भेट द्यावी
प्रदर्शनाला नागरिकांनी भेट देऊन सेवा सुशासन आणि गरीब कल्याण, गतिशक्ती व शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा प्रशासन व दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.