आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भागवत कथा:जालन्यात पं. विजयकुमार पल्लोड यांच्या वाणीतून भागवत कथा

जालना5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना शहरात १० ते १६ नोव्हेंबरदरम्यान औरंगाबाद निवासी भागवताचार्य पं. विजयकुमारजी पल्लोड यांच्या अमृतमय वाणीतून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. गायत्रीनगरातील गायत्री मंदिराजवळ सोनी निवास येथे दररोज दुपारी २ ते ६ या वेळेत ही कथा होणार आहे.

गुरुवारी सकाळी ९ वाजता मंगल कलश शोभायात्रा काढण्यात येणार असून, २ वाजता कथेला सुरुवात होईल. पं. विजयकुमारजी पल्लोड हे शुक्रवारी सती चरित्र, शनिवारी नृसिंह अवतार, रविवारी श्रीकृष्ण जन्मोत्सव, सोमवारी गोवर्धन पूजा, गोपी गीत, छप्पन भोग, मंगळवारी श्रीकृष्ण रुक्मिणी मंगल विवाह यावर निरूपण करणार आहेत. बुधवार १६ नोव्हेंबर रोजी कथेचा समारोप होणार आहे. या दिवशी ते सुदामा चरित्रावर निरूपण करणार असून, त्यानंतर महाआरती होणार आहे. भागवत कथा श्रावणाचा जालनेकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यजमान हिरालाल नारायणदास सोनी आणि परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...