आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावयाने सासूला पेटवले:पत्नीला माहेरीच ठेवले असल्यामुळे जावयाने सासूला झोपेमध्ये पेटवले, सासू गंभीर जखमी

जालनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीला माहेरीच ठेवले म्हणून जावयाने घरात झोपेत असलेल्या सासूला पेटवून दिल्याची घटना जालना तालुक्यातील काटेवाडी येथे शनिवारी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास घडली. यात कांताबाई विश्वनाथ कालते (५१, रा. तातेवाडी) या गंभीर जखमी झाल्या आहेत. संशयित भगवान रामराव हिवाळे (रा. डोणगाव, ता. जाफराबाद) याला अटक झाली.

तातेवाडी येथील कांताबाई कोलते यांच्या मुलीचा विवाह काही वर्षांपूर्वीच डोणगाव येथील भगवान हि‌वाळे याच्यासोबत झाला होता. भगवानला दारूचे व्यसन लागले. नंतर तो नेहमी पत्नीला शिवागीळ करून मारहाण करत होता. कंटाळून त्याची पत्नी चार वर्षांपासून माहेरी आली होती. शनिवारी रात्री कांताबाई या कुटुंबासह घराच्या ओट्यावर झोपलेल्या होत्या. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भगवान हिवाळे हा तेथे आला. माझ्या पत्नीस माहेरी का ठेवले, असे म्हणत सासू कांताबाई कालते यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. नातेवाइकांनी तातडीने त्यांना जालना येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिस निरीक्षक रघुनाथ नाचण, उपनिरीक्षक पोहार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी कांताबाई कोलते यांच्या फिर्यादीवरून संशयित भगवान हिवाळे याच्याविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...