आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेतृत्व:कबड्डी स्पर्धेत जेबीके संघ करणार विभागीय पातळीवर नेतृत्व

टेंभुर्णी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा प्रबोधिनी जालना येथे नुकताच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील श्रीमती जेबीके विद्यालय १७ वर्ष वयोगटातील संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला. या संघाची निवड विभागीय स्तरावर करण्यात आली आहे.

जेबीके विद्यालयाचा हा कबड्डीचा पहिलाच संघ आहे. जो आता विभागीय स्तरावर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. या स्पर्धेत जेबीके विद्यालयाचा ओमराज कृष्णा उखर्डे याने अष्टपैलू कामगिरी करत संघास फायनल मध्ये उत्कृष्ट विजय मिळवून दिला. या संघास जाफराबाद तालुका क्रीडा संयोजक वाहेद पटेल. तसेच क्रीडा विशेषज्ञ खलील कॅप्टन, तालुका क्रीडा मार्गदर्शक सुरशे या सर्वाचे संघास मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे नवभारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय काबरा, संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर, सत्यनारायणाची सोनी, संस्थेचे सुभाष राठी, संस्थेचे जेष्ठ संचालक व माजी मुख्याध्यापकमधुकर निकम प्रेमसूख काबरा, राम नारायण काबरा, सुरेश काबरा, राजीव काबरा, दीपक काबरा, प्रल्हादजी टेंभुर्णीकर, विश्वनाथ सांगोळे, प्राध्यापक दत्ताभाऊ देशमुख, प्रदीप काबरा, प्रदीप मुळे, संस्थापक सदस्य डॉ. दिगंबर मुळे, गोविंद काबरा, संजय खंडेलवाल, विद्यालयाचे प्राचार्य भास्करराव चेके, विद्यालयाचे उप मुख्याध्यापक नंदकुमार काळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक पंजाब सोळंके, उपप्राचार्य मधुकर झटे तसेच विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अंकुश वाघमोडे, लक्ष्मीकांत बुकदाणे, माजी उपमुख्याध्यापक दिलीप उबरहंडे यांनी संघाचे व संघ प्रशिक्षकाचे अभिनंदन केले आहे.

श्रीमती जे.बी.के. विद्यालयाच्या या संघास क्रीडा विभाग प्रमुख कैलास भुतेकर, क्रीडा शिक्षक श्रीयुत राजेश शेवाळे, नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक कैलास पाटील जाधव यांनी संघाचे यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. विजेत्या खेळाडूंची व प्रशिक्षकांचे कौतुक तसेच अभिनंदन करण्यात येत आहे. खेळाडूंच्या या यशाबद्दल शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा आनंद झाला.

बातम्या आणखी आहेत...