आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजूर भोकरदन तालुक्यातील राजूर येथील ग्रामपंचायत भाेकरदन तालुक्यात सवाॅत महत्वाची मानली जाते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत सरपंचपदासाठी प्रतीभा भाऊसाहेब भुजंग ३६३ मतांनी विजयी झालेल्या आहे. उपसरपंचपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणूकीत जिजाबाई मगरे यांची निवड झाली. भाेकरदन तालुक्यातील श्री क्षेत्र राजूर येथील ग्रमपंचायत निवडणूक चुरशीची झाली आहे. जालना जिल्ह्याचे या नीवडणूकीकडे लक्ष लागून हाेते. माजी सरपंच भाउसाहेब भुजंग यांनी केलेल्या विकास कामांची पावती म्हणून , या ग्रामपंचायत निवडणूकीत त्यांच्या पत्नी प्रतीभा भुजंग यांना विजयी केले.
विशेष म्हणजे सरपंच हे गणपती संस्थानचे पदसिद्ध विश्वस्त असतात. त्यामुळे राजूरच्या सरपंच पदाला अधिक महत्व आहे. गुरुवार राेजी उपसरपंच पदासाठी निवडणूक सरपंच प्रतिभा भुजंग यांच्या अध्यतेखाली बैठक घेण्यात आली. यात जिजाबार्इ मगरे यांची उपसरंपचपदी निवड झाली. यावेळी निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून आर. एल. तांगडे यांनी काम पाहीले आहे. यावेळी सुधाकर दानवे, माजी सरपंच भाऊसाहेब भुजंग, रामेश्वर साेनवणे, माजी सभापती भाऊसाहेब काकडे, विनाेद डवले, राहूल दरक, अप्पासाहेब पुगंळे, मुसासेठ साैदागर, गणेश साबळे, भगवान नागवे, श्रीराम पुंगळे, माेहनीराज मापारी, पंढरीनाथ करपे, गुलाबराव मगरे, संताेष मगरे, बालू जगताप यांची उपस्थिती होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.