आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:जिजाऊ योगा सेंटरचे राज्यस्तरीय‎ सूर्यनमस्कार स्पर्धेत घवघवीत यश‎

जालना2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबड येथे झालेल्या राज्य स्तरीय‎ सूर्यनमस्कार स्पर्धेत जिजाऊ योगा सेंटरच्या संचालिका‎ गीता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या गटात‎ चाळीस व पन्नास वर्षे वयोगटातील १० योगसाधिकांचा‎ सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत सहा महिला‎ स्पर्धकांनी तब्बल १५६ सूर्यनमस्कार केले. त्यांना गोल्ड‎ मेडल, ४ स्पर्धकांनी १२१ सूर्यनमस्कार करून रौप्य‎ पदक, प्रशस्तीपत्र, योगा मॅट बक्षीस स्वरूपात मिळवले.‎

या स्पर्धेत विद्यावती खंडेलवाल, गीता विश्वकर्मा,‎ सुनिता जगताप, आशा कळंबे, द्वारका भुम्बर, जया‎ जगताप, विद्या सानप, मनीषा सुळसुळे, अश्विनी‎ अंभोरे, जयमाला पुरी यांनी यश संपादन केले. या‎ स्पर्धेकरीता देवा चित्राल, शिल्पा शेलगावकर, मीरा‎ थोरात, भाग्यश्री पाटील यांनी प्रोत्साहन दिले.‎

बातम्या आणखी आहेत...