आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:सुरंगळी येथील मंडळाला जोगदंड यांची भेट

भोकरदन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सुरंगळी येथील काशी विश्वेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाला भोकरदन पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी भेट देऊन पाहणी केली.

यावेळी रामेश्वर दांडगे, उपसरपंच विनोद जाधव, मंडळाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे, संजय दांडगे, योगेश बुलगे ,धनराज काळेंसह मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक रत्नदीप जोगदंड यांनी गणेश मंडळाच्या सर्व भक्तांना मार्गदर्शन करताना सांगितले की, गुलाल उधळण्याऐवजी फुलांचा वापर करून धार्मिक कृती ज्यात भजनी मंडळांचा समावेश करून शांतता सुव्यवस्थेचा बाधित राहण्यासाठी गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी माजी सरपंच डॉ. संजीव पाटील, पत्रकार शेख समदभाई, सुभाष वरपे, पोलिस नाईक बावस्कर, राहुल पाटील, सतीश जाधव आदींचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...