आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:हत्ती रिसाला मिरवणुकीत सहभागी व्हा

जालना‎16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गत १३४ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या‎ धूलिवंदन हत्ती रिसाला उत्सव समितीच्या‎ वतीने यंदाही होळी उत्सव व हत्ती रिसाला‎ मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.‎ जालेकरांनी यात मोठ्या संख्येने सहभागी‎ व्हावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष‎ अंकुशराव राऊत यांनी केले आहे.‎ रविवारी मिरवणुकीसाठी रंगरंगोटी करून‎ सज्ज करण्यात आलेल्या हत्तीची पाहणी‎ समितीच्या वतीने करण्यात आली.

या वेळी‎ अध्यक्ष अंकुशराव राऊत, अंकुशराव‎ देशमुख, कार्याध्यक्ष सुभाषचंद्र देविदान,‎ सरचिटणीस रमेश गौरक्षक, उपाध्यक्ष मुन्ना‎ गजबी, दिगंबर पेरे, सूर्यकांत पवार,रावसाहेब‎ पवार, गोविंद गाजरे, बालाजी बांडे यांची‎ उपस्थिती होती. सोमवारी दुपारी ४ वाजता‎ बस स्थानकाजवळील राऊत नगर परिसरात‎ होळी उत्सव साजरा केला जाईल. मंगळवारी‎ सकाळी १० वाजता काद्राबाद परिसरातील‎ रंगार खिडकी येथून हत्ती रिसाला मिरवणूक‎ काढण्यात येणार आहे. जालनेकरांनी यात‎ मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन‎ अध्यक्ष अंकुशराव राऊत, कार्याध्यक्ष‎ सुभाषचंद्र देविदान यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...