आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीर किसान चळवळ व जनजागृती अभियान:वीर किसान पार्टीच्या चळवळीत सामील व्हा;अध्यक्ष गुलाबराव गवळी यांचे आवाहन

जाफराबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी काळात भारतीय वीर किसान पार्टी देशव्यापी वीर किसान चळवळ व जनजागृती अभियान राबवित आहे यात शेतकरी, मुकबधीर, कामगार, कष्टकरी, आदिवासी, वंचित उपेक्षीत यासह विविध घटकातील नागरीकांकडे पक्षाचे पदाधिकारी जावुन त्यांच्या समस्या जाणून घेणार त्यांच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा उभा करणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव गवळी यांनी सांगितले.

जाफराबाद येथे आयोजित वीर किसान चळवळ व जनजागृती अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद गवळी, अनिल गवळी, तातेराव गायकवाड, सत्यम उरफाटे, अॅड. सुरेश तांदुळजे, गंगाबाई वाढेकर, सावित्री बरडे, बी. के. सवडे, राम ससाने, राजीव वेलदोडे, दत्ता मोरे, फुलाबाई जाधव, संगिता बढे, संगिता दौंगे, मल्हारी टाले, गंगाताई राठोड, सावित्राबाई बरडे, अशोक गवळी, नारायण पगारे, उमाकांत सुरडकर, भानुदास म्हस्के, संदिप पालवे, नारायण लाहोरकर, बाळासाहेब चिचोलीकर, गुलाबराव पंडीत, युनुस पठाण आदींची उपस्थिती होती.

गवळी म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले आहे, शेती मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढली असुन भुकबळी, अन्याय अत्याचाराला पेव फुटले आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पक्षाने जनजागृती अभियान राबविण्याची योजना आखलेली आहे.

तसेच येणाऱ्या काळात पक्ष स्थानिक स्वराज्य निवडणुका तसेच लोकसभा तथा विधानसभा लढविणार असुन जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार आहे व विकास कसा असतो हे विरोधकांना दाखवुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध पदांसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी सिल्लोड तालुकाध्यक्ष म्हणुन राजीव वेलदोडे, वरुड शाखा उपाध्यक्ष दत्ता मोरे यांची नियुक्ती करण्यात आली.