आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उद्यापासून संयुक्त कुष्ठरुग्ण, सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम ; तपासणीसाठी 1287 पथके

जालना23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत संयुक्त कुष्ठरुग्ण व सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान ३ लाख ६६ हजार ९१४ घरांतील १८ लाख ३४ हजार ५६३ लोकांची तपासणी करण्यासाठी १२८७ पथके नेमली असून संनियंत्रणासाठी २५७ पर्यवेक्षक असणार आहेत.

यात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग आजारासाठीची शारीरिक तपासणी ही आशा व पुरुष स्वयंसेवकांमार्फत करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी हे मोहिमेचे पर्यवेक्षण करणार आहेत. यादरम्यान ग्रामीण भागातील १०० टक्के व शहरी भागातील ३० टक्के जोखीमग्रस्त घरांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या अभियानाअंतर्गत समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचारादारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, नवीन कुष्ठरुग्णांमध्ये विकृतीचे प्रमाण दर १० लाख लोकसंख्येमागे एकपेक्षा कमी करणे, मोहिमेमध्ये प्रशिक्षित पथकांद्वारे गृहभेट देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीस शोधणे, संशयित क्षयरुग्णांचे दोन थुंकी नमुने व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार रुग्णांची सिबीनॅट व ट्रेनॅट तपासणी करून क्षयरोगाचे निदान करणे, औषधोपचार सुरू करणे तसेच कुष्ठरोग व क्षयरोगाबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रिय क्षयरोग शोधमोहिमेसंदर्भात जिल्हा समन्वय समितीची सभा १ सप्टेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. त्यात डॉ. राठोड यांनी दिलेल्या सूचनेनुसार हे नियोजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...