आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशारा:तीर्थपुरी शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या प्रश्नावर पत्रकार आक्रमक; आंदोलनाच्या पवित्र्यात

तीर्थपुरी10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या विजेच्या प्रश्नावर पत्रकार आक्रमक असून १५ दिवसांत समस्या मार्गी न लावल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

तीर्थपुरी शहरासाठी स्वतंत्र फिडर असतानाही किरकोळ कारणावरून वारंवार वीज खंडित राहत असल्याने व्यापारी, बँका, इतर ऑनलाइन काम करणाऱ्या संस्था व सामान्य जनता त्रस्त झाली होती. राजकीय पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांना सांगूनही काहीच फायदा होत नसल्याने सर्व वैतागले होते. सर्वसामान्य जनतेने मांडलेल्या समस्यांविषयी बुधवारी तीर्थपुरी येथील सर्व पत्रकारांनी येथील वीज उपकेंद्राचे शाखा अभियंता व्यंकटेश परसे, तालुका वीज वितरण समितीचे अध्यक्ष रमेश धांडगे यांची उपकेंद्रावर भेट घेऊन विजेच्या समस्येविषयी सविस्तर चर्चा करून किरकोळ कारणावरून वारंवार खंडित होत असलेल्या विजेच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना करा नसता सर्व पत्रकार मिळून कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी येत्या १५ दिवसांत तीर्थपुरी शहरातील विजेच्या समस्यांवर तोडगा काढण्याचे आस्वासन अध्यक्ष रमेश धांडगे व शाखा अभियंता व्यंकटेश परसे यांनी दिले.

तीर्थपुरी शहरासाठी असलेल्या एकूण २५ ट्रान्सफॉर्मरपैकी एका ट्रान्सफॉर्मरवर जरी काम करायचे असेल तर संपूर्ण गावाचा वीज पुरवठा बंद करून काम केले जाते. नियमाने ज्या भागात बिघाड झाला त्याच भागातील ट्रान्सफॉर्मरचा वीज पुरवठा बंद करून काम केले पाहिजे, मात्र संबंधित लाईनमन किरकोळ कामासाठी संपूर्ण गावाचा वीज पुरवठा कित्येक तास बंद ठेवतात. त्यासाठी आता तोडगा म्हणून सहा ठिकाणी एबी स्विच बसवण्याचा निर्णय घेतला, एबी स्विच बसवल्यानंतर तेवढाच भागाचा वीज पुरवठा बंद करून काम करता येईल. तसेच ट्रान्सफॉर्मरवरच्या फ्यूज बॉक्सचे मेंटनन्स, लोंबकलेल्या तारा, अनधिकृत आकडे टाकणाऱ्यांवर वेळोवेळी कारवाई करणे तसेच येथून पुढे दिवसभरात कोठेही बिघाड झाल्यानंतर कधीही ३३ केव्ही केंद्रावरून वीज बंद करण्याचे परमिट मिळणार नसून ते केवळ दुपारी चार ते पाच यावेळेतच परमिट काढून जेथे-जेथे बिघाड झाला असेल तेथील बिघाड परमिटच्या वेळेतच दुरुस्त करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या बैठकीला शाखा अभियंता व्यंकटेश परशे, घनसावंगी तालुका वीज वितरण समितीचे अध्यक्ष रमेश धांडगे, दादासाहेब मुळे, बद्रीनाथ मते, रमेशचंद्र बोबडे, रवींद्र बोबडे, सर्जेराव गिरे, सतीश केसकर, अशोक खेत्रे, भरत साबळे, महादेव जगदाळे, वीज कर्मचारी आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...